धरणगावात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

68

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगाव: येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पारायण, धार्मिक कार्यक्रम, भजन, भंडारा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
हनुमान जयंतीनिमित्त शहरातील मोठा माळी वाडा, रामदेवजी नगर, लहान माळी वाडा, हनुमान नगर, संजय नगर, शनी मारुती मंदिर, विवरे रस्त्यालगत हनुमान मंदिर यांसह अन्य मारुती मंदिरे रोषणाईने सजविण्यात आली होती. सकाळपासूनच मंदिरांमध्ये भक्तांची वर्दळ होती. शहरातील हनुमान नगर मित्र मंडळ, रामदेवजी नगरात पापा वाघरे मित्र मंडळ, विवरे रस्त्यालगत करण वाघरे मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सवानिमित्त रामदेवजी बाबा नगर, हनुमान नगर, मोठा माळी वाडा, विवरे रस्त्यावरील हनुमान मंदिर, संजय नगर आदी मंडळाच्या वतीने दिवसभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.