हनुमंतराव तरटे …एक ‘शांत ‘ वादळ..!

85

दोन दशकापुर्वी आष्टी हे एक मजबुत वेस असलेले गांव.तरीही वेशीच्या आत ही एक चांगुलपणा असतो…सर्व धर्म समभाव असतो हा अनुभवही येथेच आला.अगदी वेशीच्या आत अगदी दर्शनी भागावर तरटे सायकल मार्टची पाटी दिसत असे. या ठिकाणी शिक्षण संस्थेचा संचालक असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते.पुढे आठवीच्या दिवाळी नंतर हेच तरटे सर आम्हाला इंग्रजी शिकवु लागले…! विषय अवगड असतानाही तो विषय सुलभ करुन सांगण्याची हातोटी सरांकडे होती.प्रत्येक विद्यार्थी केवळ मानसशास्ञातुनच न तपासता तो त्याच्या सामाजिक परिस्थीतुनही ते चेक करत असत.सामाजिक आशय व राष्ट्रीय एकात्मता हा विषय त्यांच्या जिव्हाळ्याचा होता.सर माझे मिञ कधी झाले हे ही मला कळाले नाही.त्यांच्यातला आदर्श शिक्षक रुजवत रुजवत आम्ही या शाळेतुन दहावीला विशेष श्रेणी प्राप्त केली.

विद्यार्थी परिपुर्ण व्हावा म्हणुन वक्तृत्व व नाट्य स्पर्धा ही असत.त्या काळात 1988-1989 मध्ये सरांनी स्वरचीत एक वादळ …शांत शांत नाटक बसवले.मध्यवर्ती असलेली शिक्षकाची भुमिका माझ्या वाट्याला आली यात माझे भाग्य समजतो.कारण कदाचित ते त्यांना माझ्यात पहात होते.त्या शिक्षकाच्या समस्या माझ्यातोंडी होत्या.दोन दिवसापुर्वीच आम्ही मिञांनी म्हणजे राजेंद्र पोळ व दिलीप मंजुळकर यांनी या नाटकाचे स्केच पेन ने ड्राईंग सिटवर रंगवुन त्या नाटकाचे नांव व वेळ अशी जाहिरात चिटकवली होती.अजुनही ती जागा …ती वेस मनात रुंजी घालते.
त्या काळात ख्रिशन व हिंदु अशी आंतरधर्मीय विवाह अशी थिम असलेले ते एक अंकी नाटक होते.त्यातील ते शिक्षक या विवाहासाठी मदत करतात अशी व्यापक भुमिका असते.नाटक आष्टीकरांनी डोक्यावर घेतले होते.त्या छोट्या असलेल्या आष्टीत बाबासाहेब हिरवे याचे घर कुठे आहे हे सर्व गणेश विद्यालयाबरोबरच जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना ही माहित झाले.पुण्याच्या एका पाहुणे पहाटे पाच वाजताही व्यवस्थित चौधरी चाळीत आले…!

तरटे सरांमुळे वक्तृत्व ही बहरले.अतिशय अबोल विद्यार्थ्यांच्या मनातले वादळ फक्त सरांनी छेडले.इंग्रजी भाषण लिहुन देवुन सादर करावयास सांगितले होते.पुढे हेच सर्व मार्गदर्शन बी.एड.ला असतानाही आठवले.आदर्श शिक्षक कसा असावा…आदर्श शिक्षकाचे गुण …मुख्याध्यापकांची कर्तव्य …शालेय व्यवस्थापन या विषयासाठी पुस्तक वाचण्याची गरज पडली नाही.मा.हनुमंत तरटे सरांचे पुर्ण आयुष्य व मार्गदर्शन माझ्या समोर होतेच. प्राध्यापकाची नौकरी लागल्यानंतर घरी फोन व डिरेक्टरी आली.त्या डिरेक्टरीत मी पहिल्यांदा आष्टी काढुन त्यातला हनुमंतराव तरटे सरांचा लँड लाईन शोधुन काढला…!

अशी ओढ कदाचित रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरते यात नवल नाही.पुढे मोबाईल…फेसबुक आले…तरीही आम्ही जोडले गेलो ते पुन्हा नव्यानेच…जुन्याच आठवणी नव्या तांञिक युगातही समर्थपणे जोडल्या जातात, हे रुणानुबंध अजुनही घट्ट होतात…!

✒️कवी/लेखक:-प्रा.बी.जे.हिरवे
( वसंत महाविद्यालय केज)मो:-9881858578

▪️संकलन:-नवनाथ पौळ
(केज तालुका प्रतिनिधी)
मो:-8080942185