✒️लेखक:-संदीप गायकवाड(मो:-९६३७३५७४००) मानवीय समाजाच्या उन्नतीसाठी जगामध्ये अनेक क्रांत्या घडून आल्या.मानवीय समाजाला नैसर्गिक अधिकार मिळावे यासाठी मोठे आंदोलन झाले.पृथ्वीवरील जन्माला येणारा व्यक्ती बॉयलाजीकल डिफरन्सेश सोडले तर समान आहेत.भौगोलिक परिस्थितीनुसार शरीर रचनेत काही फरक दिसून येतात पण शरीराचे सर्व घटक समान असतात.तरी आजही समाजात मानवाला समान मानण्यात येत नाही.विज्ञानाचा सिध्दांत नाकारून विषमतेची
तो दिवस आम्हा नवरा बायकोच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता.ती गरोदर होती सातवा महिना सुरू होता.निर्भय तिच्या पोटात वाढत होता.माझा तीन महिन्यापासून पगार झाला नव्हता.मी कंत्राटी कामगार होतो.आणि वेळ अशी आली होती,घरातलं सगळं राशन संपलं होतं.गॅस संपून आठ दिवस झाले होते.स्टोव्ह मध्ये शिल्लक राहिलेल्या रॉकेलवर ती काटकसर करून कसातरी दोनवेळचा
🔸स्वच्छ भारत अभियान[ भाग-१ला ] भारताचे सांप्रत पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेबांनी इ.स.२०१४ पासून दरवर्षी २ ऑक्टोबर हा दिवस ‘राष्ट्रीय स्वच्छतादिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. नवी दिल्ली येथील राजघाट रस्त्याच्या स्वच्छतेचा शुभारंभ मा.पंतप्रधान साहेबांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. खरे तर स्वच्छता ही एका दिवसाने साध्य होणारी गोष्ट नाही. ती वेळच्या
🔸स्वच्छ भारत अभियान [ भाग – २रा ] अख्ख्या विश्वाच्या इतिहासात सर्वप्रथम सतराव्या शतकामध्ये स्वच्छतेचा पाया जर कोणी घालून दिला असेल तर तो आपल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ! आपल्या परिसरात इतरत्र कोठेही घाण-शौच करून परिसर प्रदूषित होऊ नये. आजारांना आयतेच आमंत्रण-निमंत्रण मिळू नये. याच उदात्त हेतूने महाराजांनी प्रत्येक गड-किल्ल्यांवर
माझे डोळे जन्मतःच लालभडक आहेत. आपण त्यांना तसे होण्यास अथवा दिसण्यास काही एक उचापत केलेली नाही. माझ्या तीर्थरूप आई-वडीलांनी सुध्दा त्यांना घडविले नाही. ती त्या परमेश्वराची लखलाभ देणगी आहे. हे कोणत्याही डोळ्यांच्या तज्ञ डॉक्टरांना कळते. बालपणी तर माझी सर्वच भावंडं मला ‘लालडोळ्या’ म्हणून हिणवत असत, हे मला आजही चांगलं आठवतं.
कोणतीही भारतीय स्त्री किंवा पुरुष ज्याची वय वर्षे साठ अथवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना जेष्ठ नागरिक असे संबोधण्यात येते . साधारणपणे या वयात माणसाला मानसिक व शारीरिक थकवा येत असतो .शरीर साथ देण्यास हळूहळू असमर्थ ठरू लागते .त्यामुळे थोडीशी चिडचिड हटवादीपणा वाढतो . म्हातारपण म्हणजे कळत्या वयातील एक बालपण असते
घरी न जाण्याचा खूप संकल्प केलता पण पसरत्या आजाराला थांबविण्यासाठी सरकारकडे काही औषध नव्हतं. आजार होता covid-19 (कोरोना वायरस). हा आजार चिनवरती मात करून त्याने दुसऱ्या देशांकडे झेप घेतलेली. त्यातलाच भारत एक आणि त्या भारतातलं पुणं विद्येचे माहेरघर. विद्यार्थ्यांचा सोशल मीडियावर हाहाकार पसरलेला. त्यांची धावपळ चालू होती. काही जणांनी स्वप्ने
जेव्हा शिवनेरी किल्ल्यात तेजस्वी सूर्यकिरणे आली, त्या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. “आज उगवला सूर्य नभीचा नव्या नवलाईचा जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा” शिवाजी हे नाव उलट अक्षराने वाचले तर ते जीवाशि तयार होते. ज्यांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र आणून स्वराज्याची निर्मीती केली
माझ्या माय बापहो,भारत हा कृषि प्रधान देशाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याची थट्टा ऐकायची तुम्हाला! तर मग ऐका. मी एक अल्पभूधारक शेतकरी. त्यात दुष्काळ, नापीकीच्यानं सतत विचारात मग्न असतो. दिवसभर शेतात घाम गाळुन थकलेला घरी परत येतो. एक दिवस घरी परत आल्या आल्या मायी चिमुरडी पोरगी बाबा आले,बाबा आले म्हणत
स्वास्थ्याला द्या तुम्ही, तुमच्या आयुष्यात पहिला क्रमांक.गोळ्या औषधांसाठी लक्षात ठेवावी लागणार नाही वेळ आणि दिनांक पूर्वीच्या काळात आपली वडीलधारी मंडळी नेहमीच म्हणायचे, आहार असा असावा की, आपल्या कुणालाही आजार होणार नाही. यासाठी आपल्या ला डोळसपणे प्रयत्न करणे आवश्यक असते. हाच दृष्टीकोन पुढे ठेवून भारतातील नवीन पिढी सुदृढ व निरोगी घडवण्याच्या