✒️शेख आवेज(सेनगाव,विशेष प्रतिनिधी)

मो:-8308862587

मालेगाव(दि.8सप्टेंबर):- तालुक्यातील गोवहा कुटे गावातील गावकऱ्यांची जागेची नोंद नसल्यामुळे त्यांना कोणत्याही ही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही उदा. घरकुलांचा लाभ मिळू शकला नाही व मिळणार नाही. तेथील जागा एकच असून काही लोकांची मालकीची नोंद केलेली आहे, परंतु काही नागरिकांची नोंद परस्परपणे ग्रामपंचायत यांनी सरकार म्हणून केली आहे.

यामुळे शासनाच्या सर्व योजनांचा फायदा मिळत नसल्यामुळे या लोक नागरिकांवर अन्याय होत आहे. याची चौकशी करण्यासाठी व नोंद करण्यासाठी शिवसेना मालेगाव तालुका प्रमुख उद्धव पाटील गोडे, शाखाप्रमुख बाळू शिंदे व उपशाखाप्रमुख भिका राठोड यांच्यातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED