✒️माधव शिंदे(विशेष प्रतिनिधी)मो:-7757073260

मुक्ताईनगर(दि.10सप्टेंबर):- तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील ग्रामपंचायत येथे अपंग व्यक्तींना पाच टक्के निधी मिळावा या साठी रुद्र अपंग संघटना महाराष्ट्र राज्य मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष, कुणाल दादाराव झाल्टे यांनी कुऱ्हा ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या कडे अपंग व्यक्तींचा पाच टक्के निधी उपलब्ध व्हावा या साठी निवेदन देण्यात आले.

तरी त्यांनी ग्रामसेवक याना सांगितले की जर तुम्ही अपंग व्यक्तींचा निधी लवकर उपलब्ध करून नाही दिला तर याला कुऱ्हा ग्रामपंचायत जबाबदार असणार आहे तरी लेखी निवेदन देत असतांना भारिप बहुजन आघाडीचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष भिकाजी आसलकर व इतर गावकरी व अपंग व्यक्तीं उपस्थीत होते संबंधित माहीती हर्षल झाल्टे (समाजसेवक) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED