आमदार श्री.संतोषराव बांगर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन

31

✒️शेख आवेजवि(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.13सप्टेंबर):-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील दुघाळा, सिद्धेश्वर तांडा, नंदगाव तांडा, घारेवाडी, ब्राह्मणवाडा चव्हाण तांडा, ब्राह्मणवाडा तांडा, माथा, तामटी तांडा, काकडदाभा, निशाणा, सुरेगाव येथे आमदार विकास निधीतून पाच लक्ष रुपयांच्या सीसी रोड आणि सभामंडप बांधकामांचे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.संतोषराव बांगर व तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नगरसेवक रामभाऊ कदम, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, अनिल देशमुख, तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, गंगाधर पोले, शहर प्रमुख अनिल देव, नगराध्यक्ष गणेश कुरवाडे यांच्यासह सर्व शिवसैनिक व युवासैनिक तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती.