

अवतारले या भूमीत सर्वश्रेष्ठ
संत ज्ञानेश्वर,संत नामदेव
संताची पवित्र भूमी ही
आहे तिला सांप्रदायाची जोडं
संत मुंक्ताई संत जनाबाई
अवतरल्या याचं भूमीतुन
तीर्थ क्षेत्र मराठवाड्यातले
संत एकनाथाचे पैठण
भूमी ही साहित्यिकांची
थोर थोर कलावंतांची
मराठवाडा माझा आहे
मातृभूमी संत महंतांची
संत महात्मे साई बाबाचे
मराठवाडाच जन्मस्थान
यांच मराठवाड्यात अवतरले
राष्ट्र संत बाबा भगवान
संतांच्या पावन पद स्पर्शाने
धन्य धन्य झाली ही भूमी
भाग्य आमचे खूप मोठे
जन्मलो मराठवाड्यात आम्हीं
✒️कवी:-अंगद दराडे
माजलगाव बीड
मो:-8668682620
🔸मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा