हिंगणघाट शहरात शेळ्या-मेंढ्या चोरीला उधाण

19

🔺एका आरोपीला अटक-एक फरार

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट,विशेष प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.२१सप्टेंबर):-शहरात गोधन तसेच शेळ्यामेंढ्यांच्या चोरिच्या घटनेत वाढ होत असून भुरटे चोर यात मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे.शहरातील शास्त्री वार्ड येथील एका मेंढपाळाच्या एका बकऱ्यास जीवे मारून त्याचा मांसाहार केल्याची घटना काल २० रोजी घडली.

आरोपिंनी स्थानिक शास्त्री वार्ड येथील नरेश नामदेव डोनारकर या गरीब ईसमाच्या ५ बकऱ्यांपैकी पांढऱ्या रंगाच्या विटकरी ठिपके असलेल्या बकऱ्याची चोरी केली.सदर बकऱ्याची किंमत अंदाजे ३ हजार रुपये सांगण्यात आली.

सदर घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिसात केल्यानंतर यातील आरोपी बादल पवार(२०)यास अटक करण्यात आली तर घटनेतिल इतर दिपक यादव डांगरी तसेच ज्याचे घरचे साहित्य घेऊन बकरा कापला तो अंकुश खडसे इत्यादि आरोपी अजूनही फरार आहेत.सदर प्रकरणी पीएसआय बागड़े ,पोहवा लांडगे पुढील तपास करीत आहेत.