अंकाई बारीजवळ सराफास लुटणारे टोळीचा अवघ्या २४ तासात येवला तालुका पोलीसांनी लावला छङा

  39

  ✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

  मो:-9960227439

  नाशिक(दि.4ऑक्टोबर):-दि. ०१/१०/२०२० रोजी मनमाड येथील सराफ व्यवसायिक श्री. संतोष दत्तात्रय बाविस्कर हे कातरणी विसापुर तसेच विखरणी या भागात ग्राहकांनी त्यांना मागणी केलेले सोने चांदीचे दागिने पोहच करण्यासाठी तसेच नविन दागिन्याची ऑर्डर घेण्यासाठी ते सदर भागात त्यांचे अॅक्टीव्हा स्कुटी मोटार सायकलवर आले. त्यांनी त्यांचे व्यवसायाचे कामकाज करुन विखरणी येथील बाजार करुन विसापुर रोडने मनमाडकडे जात असतांना खर्डी क्रेशर जवळ सायंकाळी ०४.४५ वाजेच्या सुमारास पाठीमागुन मोटार सायकलवर तीन अनोळखी इसम आले. त्यांनी फिर्यादीचे मोटार सायकलला त्यांची मोटार सायकल आडवी मारुन स्कुटीवरुन त्यांन खाली पाडुन एका इसमाने चाकुने श्री. बाविस्कर यांचे डावे बाजुस बरगडीवर मारुन दुखापत केली.

  तसेच स्कुटीला अडकविलेली पिशवी काढुन त्यातील १,०५,००० रुपयाचे सोन्याचे ३० ग्रॅम वजनाचे दागिने तसेच एक किलो वजनाचे चांदीचे जोडवे तसेच पायातील पैंजण तसेच रोख २५,०००/- रुपये व दागिने संबधीत असलेले साहित्य हिशोबाची डायरी असे एकुण १,३०,०००/- रुपयाची मालमत्ता जबरीने चोरुन नेऊन तेथुन पळुन गेले सदर बाबत सराफ संतोष दत्तात्रय बाविस्कर यांनी तक्रार दिल्यावरुन येवला तालुका पोलीस स्टेशनला गु.र.न. २८०/२०२० भादवि कलम ३९४, ३४१,३४ प्रमाणे दि. ०१/१०/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर मा. श्री. सचिन पाटील, पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, तसेच मा. श्री. संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव आणि मा. श्री. समिरसिंह साळवे, उपविभागिय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग मनमाड यांनी केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार येवला तालुका पोलीस स्टेशन कडील सहा. पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे. पो.हवा. माधव सानप, पो.कॉ. किरण पवार, आबा पिसाळ, सतिष मोरे, मुकेश निकम यांनी अतिशिघ्रतेने गुन्ह्याचे घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करुन तसेच फिर्यादीचे दिवसभर व्यवसायाचे ठिकाणी तातडीने भेटी देऊन आढावा घेऊन वरील लुटमारीचा प्रकार घडवुन आणणारे अनोळखी गुन्हेगाराबाबत जनसंपर्कातुन गोपनिय माहीती मिळवुन अवघ्या २४ तासात सदर गुन्ह्याचा मास्टर माईन्ड १) चेतन शशिकांत पवार, वय २२ वर्ष रा. तिसगांव ता. चांदवड यास त्याची सासरवाडी गुजरखेडे ता. येवला येथुन ताब्यात घेतले.

  त्याचेकडेस सखोल तपास करुन त्याचे साथीदार २) समाधान सुकदेव मोरे, वय २२ वर्ष, रा. विखरणी, ३) योगेश रमेश पवार, वय २० वर्ष, रा. विखरणी, ४) सतिष शिवाजी माळी वय २२ वर्ष, रा. दरसवाडी ता. चांदवड, ५) भुषण बाळु पवार, वय २७ वर्ष, रा. रायपुर ता. चांदवड यांना वेगवेगळे ठिकाणावरुन त्यांचा शोध घेवुन त्यांना पकडले आहे. पकडलेल्या चोरट्यांनी वरील व्यवसायिकास चाकुने मारहाण करुन त्याचेजवळ असलेले रोख रुपये व सोने चांदीचे दागिने असलेले पिशवी लुटल्याचे कबुली दिली आहे.

  लुटमार करणाऱ्या पैकी एक साथीदार फरार आहे. पकडलेल्या वरील ५ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत हे करीत आहेत. तसेच सदर लुटमारीचा घडलेला गुन्हा येवला तालुका पोलीसांनी २४ तासात उघडकीस आणल्यामुळे येवला शहर व मनमाड शहर येथील सराफ व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.