बानेगांव ता.घनासावंगी येथे एकाच दिवसात कोरोना व्हायरसचे पॉज़िटिव १६ रुग्ण

28

🔸बानेगावात कोरोना व्हायरसचा कहर सुरूच

🔹बानेगांवसह पंचक्रोशीत उडाली खळबळ, परिसरातील सर्व नागरिक भयभीत

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.17ऑक्टोबर):-घनासावंगी तालुक्यातील बानेगांव येथे एकाच दिवसांत सोळा कोरोना पॉज़िटिव रुग्ण आढळल्याने गावासह पंचक्रोशीत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या बानेगाव येथे दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शुक्रवारी एकाच दिवसात १६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.बानेगावात एकूण रुग्णसंख्या ४२ पोहोचली आहे.

बानेगाव गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. ३०सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तब्बल ४२ रूग्ण आढळून आले असून एकाच रुग्णाचा मृत्यू झाला आहे.झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १६ रूग्ण आढळल्याने गावातसह परिसरातील सर्व गावांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.ग्रामपंचायती तर्फे गावात निजंतुकीकरण करण्यात आले.आरोग्य विभागाने नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी सरपंच पुरूषोत्तम उढाण यांनी केली.रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नाटकर यांनी
सांगितले.