नीट परीक्षेत यश संपादन केल्या बद्दल अनुभव भगत याचा सत्कार

34

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.19ऑक्टोबर):-दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी नीट चा निकाल लागला त्यामध्ये जालना शहरातील अनुभव नागोराव भगत या विद्यार्थ्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये नीट या खडतर परीक्षेमध्ये 557 गुण प्राप्त केले. अनुभव हा सेवानिवृत्त स्वा. आयुष्यमान गायकवाड यांचा नातू आहे. जिद्द, चिकाटी,आणि सातत्याच्या जोरावर कठीण असणाऱ्या या परीक्षेतही अनुभव येणे यश संपादन केले.

त्याबद्दल डॉ.सुशीलकुमार सूर्यवंशी साहेब,महेंद्र सोनवणे सर,प्रशिक खंडारे,शुभम गायकवाड,विशाल वाघमारे,प्रदीप सोनवणे व तक्षशिला फाउंडेशन च्या वतीने सत्कार करून त्याचे तोंड भरून कौतुक केले. पुढील उज्वल भविष्यातही नेत्रदीपक कामगिरी करण्यासाठी यावेळी अनुभव यास शुभेच्छा देण्यात आल्या.