नेरी येथील पत्रकारांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

32

🔸वाढदिवसाच्या शुभपर्वावर वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासनाचा सत्कार

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.19ऑक्टोबर):- तालुक्यातील नेरी येथील युवक पत्रकार शुभम बारसागडे यांचा 26 वा वाढदिवस नेरी येथे सर्व पत्रकार मंडळींनी मिळून साजरा करण्यात आला.
नेरी जवळील खुठाळा येथील रहिवासी असुन, प्रत्येक वर्षी नेरी येथील सर्व पत्रकार मंडळी मिळून वाढदिवस साजरा केला जातोय. यातच सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असून, या कोरोना काळात वैद्यकीय अधिकारी व पोलीस प्रशासन यांची सेवा हि स्वाताच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्याच्या जीवनाकडे सेवाभावीचे व्रत घेऊन उत्तम अशी सेवा दिली जातेय.

यामुळंच वाढदिवसाचे औचित्य साधून नेरी येथील पत्रकार मंडळींनी ठरविले की, आपल्या जीवावर उद्धार होऊन नागरिकांच्या सुखमय आरोग्यासाठी उत्तम सेवा देणाऱ्या प्रशासनातील कर्मचाऱयांचा सत्कार करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी पुरोगामी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत, कार्याध्यक्ष संजय नागदेवते, सचिव नितीन पाटील, आशिष गजभिये, प्रशांत मेश्राम सुशांत इंदोरकर, अखिल पत्रकार कलयाण बहुउद्देशीय संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष श्रीहरी सातपुते, चिमूर तालुका अध्यक्ष योगेश सहारे, रोशन जुमडे, अरविंद राऊत जगदीश पेंदाम ईत्यादी उपस्थित होते.