माननीय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या हस्ते फिटनेस हब जिम चे लोकार्पण

28

✒️सचिन महाजन(तालुका प्रतिनिधी,हिंगणघाट)मो:-9765486350

हिंगणघाट(दि.19ऑक्टोबर):-आजची युवा पिढी सुदृढ , समृद्ध व शरीराने मजबूत तसेच आजचा युवा योग्य मार्गाने जाण्याच्या दृष्टीकोनातून जनतेच्या सेवेसाठी समुद्रपूर येथे S K C फिटनेस हब वाघेडा रोड समुद्रपूर जिल्हा वर्धा येथे जिमचे लोकार्पण माननीय कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

सोबतच समुद्रपूर शहराचे नगर पंचायत अध्यक्ष गजू भाऊ राऊत , अंकुश भाऊ ठाकुर प्रदेश सचिव भाजयुमो , नगर सेवक प्रवीण चौधरी, प्रवीण बेलेकर, सौ.ताराबाई अडवे, सौ.कांबळे ताई ई.नगरसेवक उपस्थित होते. सोबतच प्रमुख माण्यावरामध्ये प्रा. मेघशाम ढाकरे, पांडुरंग जी बाभुळकर, आनंदराव थुटे उपस्थित होते.सदर जिम जनतेच्या सेवेसाठी दसऱ्यापासून सुरु होणार असे जिम चे प्रो. प्रा. सारंग चौधरी यांनी सांगितले.