बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाखा काकडदाती येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तनदिन साजरा

35

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)मो:-7875157855

पुसद(दि.25ऑक्टोबर):-तालुक्यातील काकडदाती येथील दि. बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाखा काकडदाती येथे चक्रवर्ती सम्राट अशोक विजयादशमी व ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला .सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहन जिल्हा परिषद सदस्य भोलेनाथ कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य देवेंद्र खडसे हे होते .

प्रमुख अतिथी म्हणून शाखाध्यक्ष ए.सी.कांबळे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, लक्ष्मण कांबळे, राजेश ढोले ,भानुदास प्रघाणे, संतोष सोनोने, समाधान केवटे, सुनील मनवर, शरद ढेंबरे, किसन धुळे , राहुल पडघणे , विजय निखाते , माधव कांबळे, ॲड दिवेकर ,दिवेकर मॅडम राहुल पडघणे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून त्रिसरण पंचशील सामूहिक घेण्यात आले.यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल शाखा काकडदाती मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .कार्यक्रमाची सांगता सरणतय गाथेने करण्यात आली.