वडवणी ते थेटेगव्हाण रस्त्याची दुर्दशा प्रशासनाचे दुर्लक्ष – दत्ता वाकसे

33

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.28ऑक्टोबर):-मागील अनेक दिवसापासून पावसाचे प्रमाण खूपच जास्त झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली असून त्यामुळे अपघाताचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्याच पार्श्वभूमीवर वडवणी चिंचवण थेटेगाव्हण पर्यंत रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

त्यामुळे बांधकाम विभाग व शासन प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा त्याचबरोबर माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ लक्ष घालून याठिकाणी ते रस्त्याला तात्काळ दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाला व बांधकाम विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी देखील धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हा प्रमुख दत्ता वाकसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे पुढे ते दिलेले प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की दुचाकी चालक व चारचाकी चालक रस्त्यामुळे अतिशय मेटाकुटीला आलेले आहेत.

वेळोवेळी शासनाकडे लेखी निवेदन सादर केले आहेत परंतु बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे अतिशय खूप मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाणही वाढले असून त्यामुळे तात्काळ याठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा लोकशाही मार्गाने बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहे असे देखील वाकसे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.