स्वप्नगंध साहित्य समूह आणि प्रणू चाराक्षरी साहित्य समूह आयोजित “उत्सव नवरात्रीचा ,जागर स्त्री शक्तीचा” हा नवरात्र विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न

31

✒️प्रा.रावसाहेब राशिनकर(अहमदनगर प्रतिनिधी)

अहमदनगर(दि.29ऑक्टोबर);-स्वप्नगंध साहित्य समूह आणि प्रणू चाराक्षरी समूह संचालिका कवयित्री सौ.अनिता नरेंद्र गुजर यांच्या सुंदर संकल्पनेतून साकारलेली “उत्सव नवरात्रीचा ,जागर स्त्री शक्तीचा ही अतिशय उत्कृष्ट संकल्पना.दिनांक १७/१०/२० ते दिनांक २५/१०/२० पर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमात.घराघरातील स्त्री – शक्तीचा जागर करून स्त्री – शक्तीची विविध रूपे वर्णन करण्यात आली.

त्यात नवरात्रीची प्रत्येक दिवसाची माळ स्त्री – शक्तीच्या प्रत्येक रूपाला अर्पण करून जोगवा,जागर,गोंधळ असे विविध पारंपरिक काव्य प्रकार व्हिडिओ माध्यमातून सादर करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाची सुंदर,सुरूवात कवयित्री सौ.अनिता गुजर यांनी केली तसेच दोन्ही समूह आयोजिका सौ.प्रणाली म्हात्रे,सौ.अनिता नरेंद्र गुजर,सौ.हेमा वाणी, दीपा वणकुद्रे ,आणि दोन्ही समूहातील सर्व सहभागी सदस्य मान्यवर कवयित्री रोहिणी मोराणकर,पूर्वा चौधरी,कालिंदी वाणी,कल्पना बंब,अलका येवले,उषा राऊत,राधिका बापट,विजया केळकर,जयश्री बापट,जयश्री बोरसे,प्रतिभा विभुते,गीतांजली वाणी,नीलिमा नातू,विजया शिंदे,शोभा कोठावदे,विशाखा राजे,रंजना बोरा,वीणा पाटील,हेमलता विसपुते,शालू कृपाले,प्रिया गावडे,शोभा वागळे,ज्योती आफळे,शबाना मुल्ला,स्मिता हर्डीकर,सौ.शरयू कुलकर्णी,वैशाली वर्तक यांसह सर्वांनी अतिशय उत्साहात आणि उत्स्फूर्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.

तसेच नवरात्र अष्टमीच्या दिवशी समूह संचालिका कवयित्री सौ.अनिता गुजर,समूह प्रशासिका सौ.प्रणाली म्हात्रे, समूह निरीक्षक/मार्गदर्शिका दीपा वणकुद्रे या त्रिवेणी आयोजक ग्रुप ने भोंडला विशेष कार्यक्रम सादर केला.अतिशय सुंदर आयोजन,पारंपारिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन या कार्यक्रमात दिसून आले.