दिनांक 2 नोंव्हेबर रोजी विद्रोहि मोर्चात दिव्यांग बांधवानी, सहभागी व्हावे

34

🔹नायगाव तालूका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर यांचे आवाहन

✒️शिवानंद पांचाळ(नायगाव,शहर प्रतिनिधि)मो:-9960748682

नायगाव(दि.29ऑक्टोबर):- नांदेड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या अनेक प्रश्नासाठी दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व बेरोजगार दिव्यांग कल्याणकृति संघर्ष समितीच्या वतीने दि 2 नोंव्हेबर रोजी संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल व राहुल साळवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात नायगाव तालुक्यातील हजारो दिव्यांची सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.शासन अनेक योजना जाहीर करून दि 26 मार्च ला दिव्यांग आयुक्त पुणे यांनी लेखी आदेश देऊन सुध्दा अंमल बजावणी केली जात नसुन दिव्यांचा कायदा 2016 नुसार वेळेवर सवलती देण्यात यावा.

असा कायदा करून सुध्दा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार निधी, खासदार निधी हे दरवर्षी देण्यात यावा असा शासन निर्णय 1 ते 6 व उप मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचे सताविस लेखी आदेश देऊन सुध्दा त्यांची कनिष्ठ अधिकारी आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्यामुळे व अशा जागतिक संकटकाळी दिव्यांग बांधव उपाशमारीने हेळसांड होऊ नये म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी शासन, प्रशासन आमदार मंञी यांना आपले सरकार या पोर्टलवर निवेदन व मोबाईल फोनवरून विनंती करून अनेक लाइव्ह चॅनलवर, दैनिक मध्ये प्रसिद्ध करुन सुध्दा शासन प्रशासन दिव्यांग बांधवाना मदत केली नसल्याने अशा एकोणीस विषयाबदल मोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चात दिव्यागबांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठलराव बेलकर,सय्यद मगदूम शंकरराव शिंदे, चंद्रकांत बेलकर, साविञाबाई शिंदे, निवृति वडजे ,जाधव, गायकवाड़ भगवान,मिरकुटे एकनाथ बालाजी ताटे, शंकर पांचाळ, रावसाहेब बसवदे, दिंगांबर भूरे, मोहन कऊटकर प्रल्हाद बेलकर, राजेश संञे, मदेवाड, मुंडफळे इत्यादि असे ता, प्रसिद्धि प्रमुख माधव शिंदे बरबडेकर यानी केले.