गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या मालकीची ट्रॅक्टर?

31

🔸गाडीला नंबर नसल्याने संभ्रम

✒️राहूल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.4नोव्हेंबर):- तालुक्यातील इंदाराम येथे रेती चोरी करतांना पकडण्यात आलेले ट्रॅक्टर हे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची असल्याची खमंग चर्चा आहे, परंतु गाडी विना नंबरची असल्याने संभ्रम निर्माण झाले आहे.1 नोव्हेंबर रोजी इंदाराम नजीकच्या मुदुमतुरा घाटावरून रेतीची अवैध वाहतूक होतांना महसूल कर्मचाऱ्यांनी पकडले.

त्यातच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांचे लहान भाऊ वैभव कंकडालवार यांनी विना सूचना व मुजोरीने रेतीने भरलेली ट्रॅक्टर स्वतःच्या घराच्या आवारात खाली केल्याने प्रकरण अहेरी पोलीस स्टेशन येथे दाखल झाले.अहेरी पोलीस स्टेशन येथे नामे अमोल कोरेत, वैभव कंकडालवार, अजय कंकडालवार यांच्यावर भारतीय दंड संहिता 379, 353, 186, 341, 34 नुसार गुन्हा नोंदविण्यात आले असून आरोपी फरार आहेत.

महिंद्रा कंपनीची लाल रंगाची विना क्रमांकाची सदर ट्रॅक्टर ही अजय कंकडालवार यांच्या मालकीची असल्याची जोरदार चर्चा आहे.या आधी कंकडालवार बंधूंची ट्रॅक्टर गत सप्टेंबर महिन्यात सोमवार 21 व मंगळवार 22 रोजी सलग दोनदा रेतीची अवैध वाहतूक करतांना अहेरी येथील महसूल कर्मचाऱ्यांनी पकडले होते आता 1 नोव्हेंबर रोजी पुनश्च गाडी पकडण्यात आल्याने व अहेरी पोलीस स्टेशन येथे अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने आरोपी फरार आहेत.