कुंडलवाडी ते बिलोली रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कामास सुरुवात

95

🔹रस्त्यावरील खड्ड्यांची आमदाराकडून पाहणी

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.4नोव्हेंबर):-कुंडलवाडी ते बिलोली रस्त्यावर जागोजागी शेकडो खड्डे पडल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. याबाबत आ.रावसाहेब अंतापुरकर यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी करीत खड्डे बुजविण्यासाठी १ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी मंजूर करून आणला. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सुरूवात कंत्राटदाराकडून करण्यात आली.

पदवीधर आमदार निवडणूक आचारसंहिता असल्याने कामाचे उदघाटन करता आले नसल्याने रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीच्या कामाची पाहणी ३ नोव्हेंबर रोजी आ.रावसाहेब अंतापुरकर यांनी केली.कुंडलवाडी ते बिलोली रस्त्यावर गत अनेक महिन्यांपासून जागोजागी शेकडो खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यातच दुचाकी धारकांना तर आपला जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गत अनेक महिन्यांपासून रस्ता दुरूस्तीची मागणी होत होती.अखेर या भागाचे आ.रावसाहेब अंतापुरकर यांनी याप्रश्नाकडे लक्ष देत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी करीत या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी योजनेत्तर निधीतून १ कोटी ३५ लाख रूपये मंजूर करून आणले.खड्डे बुजविण्याच्या कामाचे कंत्राट कल्याण केटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीस देण्यात आले आहे.

दि.३ नोव्हेंबर रोजी आ.रावसाहेब अंतापुरकर यांनी कुंडलवाडी ते बिलोली रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली.व या कामाचे कंत्राट मिळालेल्या कल्याण केटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे जनरल मँनेजर शिंदे यांना काम दर्जेदार करण्याच्या सुचना दिल्या.यावेळी सा.बां.विभाग देगलूर चे कार्यकारी अभियंता सुधीर नाईक,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर, प.स.उपसभापती शंकर यंकम, उपकार्यकारी अभियंता खलीपे,शाखा अभियंता बारसकर आदीजण यावेळी उपस्थित होते.