मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

31

🔹अँड.अमोलजी शिलवंत व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी पीडितेच्या बाजूने केला जबरदस्त युक्तिवाद

✒️संजय कांबळे माकेगावकर(अहमदपूर प्रतिनिधी)मो:-9860208144

अहमदपूर(दि.6नोव्हेंबर):-26 ऑक्टोंबर 2020 रोजी कालिदास ईश्वर ताकवणे या नराधमाने फरसान खाण्याच्या बहाण्याने मराठा समाजातील अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील अल्पवयीन 11 वर्ष नऊ महिन्याच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला होता.याबाबत पीडित मुलीची आज्जी यांनी यवत जि. पुणे पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने गुन्हा.रजी.नंबर 0904/2020 भा.द.वि 376 व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,व 12 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कापुरे यांनी आरोपीस तात्काळ अटक केली होती आरोपीने मा.जिल्हा सत्र न्यायालय बारामती येथे जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता मराठा समाजातील अल्पवयीन पीडित मुलीच्या वतीने वकील म्हणून नेहमीच गोरगरीब जनतेच्या वतीने न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडणारे ऍड.अमोलजी सोनवणे व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांनी घटनेची गंभीरता व तीव्रता लक्षात घेता न्यायालयात जोरदार लेखी युक्तिवाद केला.

न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता मराठा समाजातील गरीब कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहून न्यायालयात बाजू मांडल्याबद्दल या अतुलनीय कामगिरीबद्दल नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी ऍड.अमोलजी सोनवणे व ऍड.बापूसाहेब शिलवंत यांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.

पीडित कुटुंबास नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव व पांडुरंग गडेकर हे सर्वतोपरी मदत व सहकार्य करीत आहेत. नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक दादासाहेब जाधव. एम.डी.एम.जे पुणे जिल्हा निरिक्षक पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर सांबळे .पोलिस मित्र रमेशजी चितारे यांनी यापूर्वीच घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपीस फाशी देण्याची मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आक्रमकपणे मागणी केली होती……