10 नोव्हेंबर रोजी अहेरी नगर पंचायत आरक्षण सोडत होणार

94

🔹नागरिकांनी उपस्थित राहण्याचे मुख्याधिकारी यांचे आवाहन

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-9850801314

अहेरी(दि.9नोव्हेंबर):- नगर पंचायतीचे कार्यकाळ संपत असून आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी मंगळवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नगर पंचायत कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात येणार असून नगर वासीयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी अजय साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

अहेरी नगर पंचायतीत 17 प्रभाग असून या सतराही प्रभागाचे आरक्षणाची सोडत काढण्यात येणार असल्याने नगर पंचायतीच्या प्रभागातील अनुसूचित जातीच्या महिला, अनुसूचित जमातीच्या महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण महिला असा आरक्षणाचा प्रारूप राहणार असून आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करायचे आहे.

नगर पंचायतीच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी प्रसिद्धीपत्रकानवे कळविले आहे.