पाथ अबँकस विद्यार्थ्यांसाठी संजिवनी

29

आजचे युग डिजिटल युग आहे असे मानले जाते, डिजिटल युग म्हणल्या नंतर लहाणांपासुन तर थोरल्या पर्यंत मोठमोठे मोबाईल आणि महीन्याचा इंटरनेट डाटा होय. फक्त मोबाईल वापरला म्हणजे आपण डिजिटल झालो का? मुळात आपण कोणतीही संकल्पना समजून न घेता मत व्यक्त करतो आणि त्यालाच सत्य समजून बसतो हेच भारतीय जनता मागास राहण्याचे कारण आहेत. आपण कोणत्याही बाबीचा दोन्ही बाजुने विचार कधीच करत नाही.

दोन्ही बाजूने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की डिजिटल च्या नावाखाली आपणच आपले नुकसान करून घेत आहोत. लहान मुल मोबाईल हातात घेऊन दिवसभर गेम खेळतात, कार्टून बघतात वा इतर काही मोबाईल वर करतात आणि हे बघून पालक वर्गाला खुप चांगले वाटते, कमी वयात चांगल्या पद्धतीने मोबाईल हाताळता येतो म्हणजे पालक वर्ग खूप आनंदी होऊन आपल्या पाल्याचे कौतुक करतात. चांगल्या गोष्टींचे कौतुक व्हायलाच पाहिजे पण कौतुक करताना आपण चुकिच्या गोष्टीला तर समर्थन देत नाही ना याचाही विचार होणे गरजेचे असते.

आपण जर बघितले तर काही काही लहान मोठे मुलं मोबाईल मध्ये स्वतः च्या आवडीनुसार हाताळणी करत असतात. उदा. एखाद्या ला गेम जास्त आवडत असेल तर त्याला फक्त गेमच ओपण करता येते, एखाद्या ला युट्यूब वरील व्हिडीओ बघायचा तर तेच ओपण करता येते. बाकीचा मोबाईल हाताळता येत नाही वा त्यामधील त्याला काही कळत नाही. थोडक्यात डिजीटल च्या नावाखाली आपण आपल्या पाल्याला माणसिक दृष्टीने कमकुवत बनवत आहोत याचा विसरच आपल्याला पडलेला आहे. आजच्या मुलांना मोबाईल चे व्यसन जडलेले आहे.

जेवताना, झोपताना, बाथरूम मध्ये जाताना मोबाईल नसेल तर त्यांच काहीतरी हरपल्या सारखे होते. म्हणजे अती वापरा मुळे आणि पालकांच्या डिजिटल अज्ञाना मुळे मुलं डिजिटल च्या नावाखाली व्यसनाधीन होत आहे ही शोकांतिका आहे. पुर्वी मैदानी खेळ असायचे, तर्क व चिकित्सा वर आधारित खेळ असायचे, चोर शिपाई खेळताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन केल्या जायचे त्यामाध्यमातून मुलांची बुद्धी सक्रीय व चिकित्सक होत होती.

परंतु मोबाईल आणी टेलिव्हिजन ने ते सर्व बंद करून मोबाइल आणि टेलिव्हिजन ची सवय मुलांना लावली आणि लहान मुलांना त्याचे व्यसन लागले म्हणून तासंतास एकाच गोष्टींचा वापर मुले करत असतात. त्यांना लागलेले मोबाइल चे व्यसन एकदम कमी होणार नाही, पण मोबाईल द्वारेच आपण मुलांचा काही विकास करू शकतो का ? तर याचे उत्तर आहे हो. फक्त वापर तसा होणे गरजेचे आहे.वरील गोष्ट लक्षात घेऊन पाथ अबँकस यांनी एक उपक्रम सुरू केलेला आहे.

लाडाने मुलांना दिलेला मोबाईल आणि लॉकडाऊन नंतर सुरू झालेली ऑनलाइन शाळा यामुळे प्रत्येकाच्या हाती मोबाइल गेलेला आहे. ऑनलाइन शाळा संपल्यावर मुलांनी मोबाईल चा दुरुपयोग करू नाही म्हणून पाथ अबँकस सुरू करण्याचा निर्णय अपर्णा माधवे व प्रफुल्ल माधवे या दाम्पत्याने घेतला. अबँकस तस पाहिले तर आजही शिकलेल्या लोकांना सुद्धां माहिती नाही. पण काही श्रीमंत लोक, आणि ज्यांना विदेशात शिक्षणासाठी जायचे असे ज्यांचे पुर्व नियोजन असते अशाच लोकांनी लाखो रुपये देऊन आपल्या पाल्याला शिकवले आहे.

अबँकस म्हणजे नेमके काय आहे. तर बोली भाषेत सांगायचे तर अँबँकस हे असे तंत्र आहे ज्यामुळे लहान मुले आकडेमोड गणयंत्राच्या वेगाने करतात. म्हणजे जर कोणतेही गणित बेरीज, वजाबाकी, भागाकार गुणाकार कँलक्युलेटरच्या स्पिडने लहान लहान मुले करतात. आणि याचे कारण आहे अबँकस बुद्धी विकसित करून मेंदुला जागृत करण्याचे काम करते. अबँकस मुळे मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते. क्षणात केवढीही आकडेमोड करण्याची कुवत त्यांच्या मध्ये निर्माण होते.

मोबाईल चे टेलिव्हिजन चे व्यसन कमी होईल सतत नवीन काही तरी शोधण्याचा प्रयत्न मुले करत असतात. लॉकडाऊनमध्ये मुलांना सक्रीय आणि क्रिएटिव्ह बनवण्यासाठी माधवे दाम्पत्याने एक पाऊल उचलले आणि ते यशस्वी करून दाखवले. ज्यांना अबँकस काय आहे हे माहिती सुद्धा नव्हते अशा विद्यार्थां पर्यंत अँबँकस पोहचवण्याचे काम माधवे दाम्पत्य करत आहे. मोठमोठ्या शहरात, लाखो रुपये देऊन श्रीमंत लोक जे शिकवायचे तेच शिक्षण, तंत्र माधवे दाम्पत्य यांनी माफक दरात गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यां पर्यंत पोहचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

माधवे दाम्पत्याने सुरू केलेल्या या उपक्रमामुळे ज्यांना गणिताची भिती वाटत होती असे विद्यार्थी कँलक्युलेटरच्या वेगापेक्षा जास्त वेगाने मोठमोठे गणित सोडवत आहेत. काही लोकांना अबँकस आणि त्यांचे परिणाम हे कोणत्याही जादुपेक्षा कमी वाटणार नाही, पण ती जादु नसुन तंत्र आहे शिक्षण, प्रत्येकाचे मुल कँलक्युलेटरच्या स्पिडणे गणित सोडवू शकतो. स्वतः ची स्मरणशक्ती वाढवून एक स्वतः ची ओळख निर्माण करू शकतो. या साठी फक्त पाथ अबँकस ला भेट देणे गरजेचे आहे. पाथ अबँकस मुळे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होते.

आपण बघतो की पुर्वीचे लोक पाव पावकी यांचे पाढे मुखपाठ ठेवून हिशोब लावायचे, नंतर दोन पासून तिस पर्यंत पाढे ज्यांचे मुखपाठ आहेत त्याला हुशार समजण्यात यायचे. परंतु मोबाईल आला आणि पाढे, गणीत, सर्वांची जागा घेतली. सकाळी लवकर जरी उठायचे तरी मोबाईल वर आलार्म लाऊन ठेवावा लागतो. सांगण्याचा उद्देश हाच कि मोबाईल च्या अती वापरामुळे आपण आपल्या मेंदुला जास्त चालना देत नाही म्हणून कित्येक लोक तिनचार वर्षापूर्वी सर्व नातेवाईक यांचे मोबाईल नंबर पाठ असायचे आज मोबाईल मुळे घरचेही नंबर पाठ नसतात ही सत्य परिस्थिती आहे.

आणि याचे कारण आहे आपण आपल्या मेंदुला जास्तच आराम दिलेला आहे. मेंदुकडून आपण काम करून घेत नाही म्हणून मोबाईल वर अवलंबून रहावे लागते. पाथ अबँकस मोबाईल चा कमी वापर करून मेंदुचा जास्त वापर कसा करता येईल यावर भर देते म्हणून लहान लहान मुले आकडेमोड करण्यात पारंगत झालेले आहेत. मोबाईल, गेम, कार्टून बघुन वेळ घालवण्यापेक्षा पाथ अबँकस शी आपण मुलांना जोडले तर चमत्कारिक बदल आपल्या मुलांमध्ये होऊन एक यशस्वी वाटचाल आपले मुले करतील.

अँबँकस च्या एकुण आठ लेव्हल असतात. आपण आठ लेव्हल चा विचार न करता पहिले दोन लेव्हल चा जरी विचार केला तर अफलातून बदल आपल्या पाल्यामध्ये दिसेल आणि आपणच अबँकस सोडणार नाही. पाथ अँबँकस च्या माध्यमातून माधवे दाम्पत्याने हाती घेतलेला उपक्रम खरोखरच गौरवास्पद आहे. लाखो रुपये खर्च करून मिळणारे आणि विद्यार्थ्यांचा मेंदु जागृत करणारे शिक्षण कोणत्याही प्रकारच्या नफ्याचा विचार न करता फक्त गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यां पर्यंत अँबँकस पोहचावे आणि त्यांचा मानसिक विकास व्हावा याच उद्देशाने ते काम करत आहेत.

वेगवेगळे डेमो देऊन अबँकस ची गोडी निर्माण करण्याचे महत्वपुर्ण काम माधवे दाम्पत्य करत आहे. मुलांना डिजिटल व्यसनापासुन दूर ठेवण्यासाठी पाथ अबँकस खरोखर संजिवनी आहे. पाथ अबँकस सोबत जॉईन होऊन आपण आपल्या पाल्यांचा सर्वांगीण विकास करू शकता. पाथ अबँकसच्या डेमो साठी आपण खालील नंबर वर संपर्क करून मुलांचे जिवन बदलु शकता. 8668652360, 8767622156 मुलांसाठी खरी कमाई आपण काय कमाऊन ठेवले ही नाही तर मुलांना आपण कस घडवले ही खरी कमाई असते. पाथ अबँकस मुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांना खुप मोठा फायदा होऊन त्यांच्या जीवनात एक आशेचे किरण म्हणून पाथ अबँकस राहील हेही सत्य असेल.
************************************
✒️लेखक:-विनोद पंजाबराव सदावर्ते
रा. आरेगांव ता. मेहकर
मो:-९१३०९७९३००