कोरपना मतदार यादीत बोगस मतदाराचे नावे वगळण्यात यावेत

56

🔹तहसीलदार यांना निवेदन सादर

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)मो:-8698423828

कोरपना(दि.10नोव्हेंबर):-मतदार यादीत बोगस मतदाराचे नावे समाविष्ट असल्याने मतदाराची ओळख पटवून देण्यासाठी अडचण जात आहे.
बोगस नावे मतदार यादीतुन वगळण्यासाठी नमुना 7 चे अर्ज भरून निवडनुक विभागाला देण्यात आले असून बोगस व स्थलातरीत मतदाराची नावे मतदार यादीतुन वगळन्यात यावी अशी मागणी भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस ,शेतकरी संघटना, शिवसेना, युवा स्वाभिमान पार्टी, वंचीत आघiडी या पक्षiचे वतिने करण्यात आली. बोगस मतदाराचे नाव वगळण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

कोरपना मतदार यादीत या अगोदर मोठया प्रमाणात व स्थालातरीत मतदाराची नावे समाविष्ट होती त्यावेळी आक्षेप अर्ज सादर करून अनेकांची नावे वगळन्यात आली परंतु पुन्हा बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले असल्याने मतदार यादीत घेiळ दिसत आहे.

या बाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस अबीद अली, शिवसेना तालुका प्रमुख अरविंद मसे, सेतकरी संघटना युवा आघiडी तालुका अध्यक्ष अविनाश मुसळे, नगर सेवक अमोल असेकर ,एड. श्रीनिवास मुसळे, वंचीत बहुजन आघiडी तालुका महासचिव विजय जीवने, युवा स्वाभिमान पार्टीचे तालुका अध्यक्ष मोहबत खान आदी उपस्थित होते.