दिंडोरी येथे छत्रपती कामगार युवक संघटनेची मराठा आरक्षणाच्या मागणीसह महिलांच्या सुरक्षिते बाबत वणी पोलिसांत निवेदन

24

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.19नोव्हेंबर)-: दिंडोरी येथे छञपती कामगार युवक संघटनेच्यावतीने मराठा आरक्षण व स्त्रियांवरील अन्याय अत्याचारा बाबत वणी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे.

छत्रपती कामगार युवा संघटनेच्यावतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी वणी पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले . मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीत मराठा समाजाच्या लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून हा महाराष्ट्र भर तळागाळात राहणारा गोर गरीब मराठा समाज अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे.

तसेच महिला- तरुणींवर होत असलेल्या अन्याय अत्याचारा बाबत शासनाने कडक कायदे करुन माता भगिंनीना संरक्षण मिळावे या मागण्यांचे निवेदन वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना छत्रपती कामगार संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर शेलार, शिवव्याख्याते समाधान कतोरे, योगेश पाटील, पंकज पगार, राहूल गवळी, राजेंद्र जाधव, पंकज पवार, योगेश जमधडे, पकंज सोनवणे, राहूल कतोरे, शुभम दुगजे, प्रशांत जाधव, बाळासाहेब जाधव, संदिप वडजे, संदिप गटकळ, संतोष गटकळ, संकेत ऊफाडे, भास्कर पाटील इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.