बचत गटाच्या महिलांना पॅकेजचे अमिष-अमिष दाखवनारा तो “गजानन” कोण? ; तो कर्मचारी करत आहे सत्ताधारी पक्षाचे काम?

279

 

तालुका प्रतिनिधी महागाव किशोर राऊत मो. 90116 49037
. यवतमाळ :महिला सक्षमिकरणाकरीता संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सन २०१७ मध्ये महिला बचतगट कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. परंतू संपुर्ण जिल्हातील बचत गटच्या महिलांना सत्ताधारी पक्षाकडुन पैशाचे अमिष दाखवुन मतदान व मेळाव्याकरीता गर्दी जमविण्याचा नविन फंडा सत्ताधारी पक्षाकडुन केला जात असल्याची माहिती सुञांनी दिली आहे. संपुर्ण जिल्हातील बचत गटांच्या कार्यालयातील प्रमुखांना सत्ताधारी पक्षाकडुन लाखो रुपयांचे पॅकेज दिले गेले असल्याची गोपनिय माहीती नाव न सांगण्याच्या अटीवर एका सुञांनी दिली आहे. महागांव येथिल बचत गटाच्या कार्यालयातील वादग्रस्त असलेला हा कर्मचारी या सर्व प्रकारामध्ये समाविष्ठ असल्याची चर्चा सध्या चौकाचौकात रंगु लागली आहे. “गजानन” नामक एक कर्मचारी आपल्या वरीष्ठांशी मधुर संबंध ठेवुन हा प्रकारा व सत्ताधारी पक्षाचा प्रचार करत आहे. काळी दौलखानमधिल काही गांव यवतमाळ – वाशीम मतदार संघात येते म्हणुन या कर्मचार्‍याला जणु काही एखाद्या पक्षाचा राजकीय नेता असल्यासारखे वागत असुन आपणांस महिलांकरीता मिळालेले पॅकेज स्वत:च्या खिश्यात ठेवुन आपले काहीही देणे घेणे नसल्यासारखा दाखवत आहे. परंतु या कर्मचार्‍यांने सत्ताधारी पक्षांकडून लाखो रुपयांचे पॅकेज घेतल्याची चर्चा होऊ लागली आहे.

…………………

सदर प्रकारात कूठल्याही प्रकारची माहीती नाही. आमच्या कार्यालयातील कोणत्याही कर्मचार्‍याने सत्ताधारी पक्षाकडुन पदाचा दुरउपयोग करुन पैसे घेतले असल्यास कायदेशिर कार्यवाही करु.

– विशाल मनवर, तालुका अभियान व्यवस्थापक, महागांव.