शिवसेनेचे माजी खासदार सुरेश रामराव जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदावर नियुक्ती

38

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.25नोव्हेंबर):-शिवसेनेचे परभणी जिल्ह्यातील माजी खासदार सुरेश रामराव जाधव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती चे पत्र काढले असून सुरेश रामराव जाधव यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

सुरेश जाधव यांनी शिवसेनेचे खासदार म्हणून परभणी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे.लोकसभेमध्ये अनेक प्रश्न त्यांनी मांडले अनेक प्रश्नांना त्यांनी चालना दिली याच काळामध्ये राजकीय समीकरणे बदलली आणि त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला.