शेतीवर आधारीत उद्योगाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.27नोव्हेबर):-महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे इयत्ती दहावी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक युवतीकरीता दि. 10 ते 23 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये शेतीवर आधारीत उद्योग, प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे.महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही उद्योग संचालनालयाअंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत प्रशिक्षण संस्था असून या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून जास्तीत जास्त लोकाना स्वत:चा उद्योग, व्यवसाय सुरू करणेकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पुरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.

सदर कार्याशाळेत शेतीवर व अन्न प्रक्रियावर आधारीत विविध उद्योगसंधी, डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंग, दुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योग, फळ प्रक्रिया, पशुसंवर्धन इ. उद्योगातील संधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलण व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकारण, संघटनाचे प्रकार शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादक निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहरकत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन, नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, खेळते भांडवल व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक युवतीनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 9 डिसेबर 2020 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड मो.न. ९४०३०७८७७३, ०७७२-274416 व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे मो. न. ९०११६६७७१७ यांच्याशी संपर्क साधावा.