आस्था अनघादि फौंउडेशन च्या सौ. वैशाली सुनिल सौंन्दाणे-चव्हाण यांचा मुंबई येथे दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने सन्मान

30

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.27नोव्हेंबर):-दि.२३ नोहेंबर मुंबई येथिल पंचतारांकित हॉटेल ग्रॅण्ड पेनसुला येथे आस्था अनघादि फौंउडेशनच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण ह्या गेल्या अनेक वर्षांपासून समाजकार्यात आहैत.त्या,रुखमनी चॅरिटेबल ट्रस्ट च्या उपाध्यक्षा,आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश कार्य अध्यक्षा, पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा अध्यक्षा,अँटी करोन टास्क फोर्स च्या नाशिक जिल्हा अध्यक्ष, ग्लोबल इंटेरनेशनल फौंउडेशन च्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षा,तसेच अनेक संस्था वर पदाधिकारी असुन या द्वारे त्या अनेक प्रकारचे सामजिक कार्य करतात.

कोरोनाच्या काळात ,स्वतः मास्क बनवून वाटले, सॅनेटायजर,गरजुन पर्यंत किराणा, धान्य, अन्न, पोचवले.तसेच मागील महिन्यात लहान मुलांना वही पुस्तके, चित्रकला साहित्य ,दिवाळी फराळ देऊन लहान मुलांचा आनंद द्विगुणित केला.नंतर कोविड मदे काम केलेल्या सर्व स्तरातील लोकांना संस्थे मार्फत प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. निसर्गसवर्धन म्हणून मागील महिन्यात वृक्षा रोपण केले. अशा अनेक स्तरावर वैशाली ताई काम करत असतात. यात प्रामुख्याने खंबीरपणे साथ देणारे बंधु डॉ. राजेन्द्र निर्मला बापुराव चव्हाण व डॉ जितेंद्र निर्मला बापुराव चव्हाण आणि सर्व सुख दुःखात सहभागी असणारे त्यांचे तहसीलदार पती सुनिलजि सौंन्दाणे(तहसीलदार शिंदखेडा) हे वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात.

तसेच सर्व आस्था अनघादि फौंउडेशन सदस्य साथ देत असतात.अशा निवडक लोकांसाठी *दादासाहेब फाळके कोवीड १९ योद्धा पुरस्काराने नुकतेच २३ नोव्हेंबर रोजी सन्मानित करण्यात आले*.दादासाहेब फाळके आयकॉन अवार्ड फिल्म ऑर्गनायझेशनचे फाऊंडर चेअरमन फिल्म प्रोड्युसर माननिय कल्याणजी जाना यांच्या द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला तसेच सदरील पुरस्कार हा देशभरातील मोजक्याच उत्कृष्ट सामाजसेवकांना मिळाला आहे.

यात वैशाली ताई चव्हाण यांना दादासाहेब फाळके कोवीड-१९ योध्या अवॉर्ड पुरस्कार देवुन सन्मानीत करण्यात आले हा पुरस्कार ते आपले स्वर्गीय आई वडील स्वर्गीय बापुराव चव्हाण व स्वर्गीय निर्मला चव्हाण यांना समर्पित करताय.तसेच पुढिल महिन्यात अजुन एक सन्मान प्राप्त होणार आहै.लॉक डाऊन दरम्यान यांना मिळालेल्या पुरस्काराने त्यांच्यावर समाजातील विवीध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.