दिव्यांग व्यक्तीच्या प्रलंबित प्रश्नाकरीता खा. हेमंत पाटीलाची भेट

34

🔹खासदार निधीतील 5% दिव्यांग निधी खर्च करण्याची मागणी

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.30नोव्हेंबर):-दिव्यांग व्यक्तीच्या विविध योजना विषयी व खासदार निधीतुन राखिव असलेला 5% दिव्यांग निधी करीता हिंगोली लोकसभेचे खा. हेमंत पाटील यांची उमरखेड फाट्यावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले.व तसेच दिव्यांग व्यक्तीचे प्रलंबित विविध प्रश्ना विषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी खा.हेमंत पाटील यांनी दिव्यांगाच्या सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.व तसेच हिंगोली लोकसभा मतदार संघातील सर्व दिव्यांग व्यक्तीसाठी 5% खासदार निधी व दिव्यांग व्यक्तीसाठी विशेष शिबीर घेऊन दिव्यांग व्यक्तीला लागणारे पायाभुत साहित्य व साधने शिबीराचे आयोजन करुन साहित्य तात्काळ वाटप करण्यात येईल असे आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांना दिले.

व तसेच हदगांव नगर परिषद कार्यालयातील प्रलंबित मुक बधीर दिव्यांग आय.टि.आय. ईलेक्टेशियन ऊत्तीर्ण प्रशिक्षणार्थीला शिकाऊ उमेदवार म्हणून कामावर घेण्यासाठी मा. दिव्यांग कल्याण आयुक्त पुणे व विभागीय आयुक्त औरंगाबाद आणि संबंधित सर्व वरिष्ट कार्यालयाचे लेखी आदेश असुन सुद्धा नगर परिषद हदगाव हे दिव्यांग व्यक्तीला कामावर घेण्यासाठी न.पा. कार्यालयातील अधिकारी सतत टाळाटाळ व उडवा उडवीची उत्तरे आणि दिशाभूल करणारे पत्र व्यव्हार करीत असल्याचा आरोप दिव्यांग विकास संघर्ष समितीने केला आहे. दिव्यांग व्यक्तीचे जिल्हा व तालुकास्तरावर कोणतेही काम आणि कोणत्याही योजनेची परीपुर्ण अंमलबजावणी होत नसल्याने दिव्यांगा अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याची खंत समीर पटेल यांनी व्यक्त केली आहे.

दिव्यांगांच्या विविध प्रश्नासाठी त्यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश डिंकळे साहेबाशी हेमंत पाटील यांच्याशी थेट संवाद साधला. या प्ररकणातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. व तसेच दिव्यांगाचे कोणतेही प्रश्न प्रलंबित राहणार नाही. यांची ग्वाही दिव्यांग विकास संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष समीर पटेल यांना दिली.त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य चव्हाण, फारुख कुरैशी, अहेमद भाई, फहीमोद्दीन सरवरी, रमेश गोडबोले, शेख इम्रान, महेश चव्हाण, शब्बीर बेग, कुबिर राठोड, शंकर कदम,अ.गफुर, अंकुश कदम, सलमा शेख, दिपक सुर्यवंशी, सुलताना रतन कुरैशी, मारोती लांडगे, सुरज राठोड, आकाश सोनुले, कांचन वानखेडे, प्रियंका राठोड,यावेळी उपस्थित होते.