कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यानी फिरवली शाळेकडे पाठ

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.4डिसेंबर):-लोकडाऊन नंतर २३ नोव्हेंबर २०२० रोजी शासनाच्या आदेशानुसार माण तालुक्यामध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या शाळांचे वर्ग सुरु करणेत आलेत्यावेळी तालुक्यातील ७२ शाळांपैकी ६७ शाळा ह्या सुरु झाल्या त्यावेळी एकूण ११ हजार ४६७ विद्यार्थ्याचे पैकी २हजार २४० विद्यार्थी हे पहिल्या दिवशी उपस्थित होते सुरुवातीला शाळा मधील विद्यार्थी पट संख्या हि समाधानकारक होती परंतु कोरोनाच्या धास्तीने दिवसेंदिवस शाळातील पट हा कमी होत चालला आहे त्यातच देवापुर शाळेत एक विद्यार्थिनी हि कोरोनाबाधित सापल्याने काही दिवस शाळा बंद ठेवण्यात आली होती आणि काही शाळांमध्ये शिक्षकच बाधित सापडल्याने शैक्षणिक क्षेत्र आणि पालक वर्गात भीतीचे सावंट निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसात दिवाळीच्या अगोदर तालुक्यातील कोरोनाबाधिताची संख्या हि कमी होत चालली होती परंतु सणासुदीच्या काळात लोकांनी खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे आता संख्येत वाढ होऊ लागली आहे शाळा चालू झाली त्यावेळी येणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या हि अल्पच होती परंतु आता कोरोनाबाधित वाढल्याने हि संख्या आता कमी होत चालली आहे.

शाळेत येणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि कर्मचारी यांनी आपले कोविडं टेस्ट प्रमाणपत्र दिले आहे परंतु यापुढे हे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ही नसतील हे कशावरून याची शंका पालक वर्गातुन व्यक्त होत आहे विविध भागातून विद्यार्थी आणि शिक्षक येत असलेने कोरोनाच्या भीतीने पालक संमतीपत्र देऊनही आता आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार नाहीत.

याकारणामुळे शासनाला पण काय निर्णय घ्यावा हा प्रश्न पडलेला दिसून येतोय कोरोनामुळे कोणतीही शाळा रिस्क विद्यार्थ्याच्या बाबतीत रिस्क घ्यायला तयार नाही तालुक्यातील काही गावा मध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने ग्रामस्थानीच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पालकांच्या भीती आहे की आपल्या पाल्याच्या चालू शैक्षणिक वर्षाचे काय होणार?