दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मेंढकी येथील शेतकऱ्यांच्या वतीने समर्थनार्थ निवेदन

29

🔹भारत सरकारने केलेले तीन कायदे रद्द करा ही मागणी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.9डिसेंबर):-तालुक्यातील मेंढकी गावातील शेतकरी बांधवांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मेंढकी येथील बैठा सत्याग्रहाच्या वतीने समर्थनार्थ निवेदन मा. उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी , मार्फत थेट पंतप्रधान यांना पाठविण्यात आले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला मेंढकी गावातील शेतकरी बांधवांचा पूर्णपणे समर्थन आहे. असे मत गावकरी शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह करून सरकारचा जाहीर निषेध केला.तसेच दिल्ली येथे शेतकरी आंदोलन कर्त्यावर थंड पाण्याचे फवारे व लाठी चार्ज करुन शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आले त्या बद्दल मेंढकी येथील शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.

अश्याप्रकरे 8 डिसेंबर रोजी मेंढकी गावात सर्वपक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने पार पडलेल्या सत्याग्रह आंदोलनात सुधाकर महाडोरे संयोजक विदर्भ भुमिहक्क आंदोलन , श्री थानेश्र्वर कायरकर सदस्य पंचायत समिती ब्रम्हपुरी, माझी उपसभापती शामरावजी इरपाते, मोतिरामजी विधाते माझी अध्यक्ष तंटामुक्ती समिती, भूषण आंबोरकर अध्यक्ष विर शिवाजी युवा मित्र मंडळाचे तसेच उपाध्यक्ष प्रशांत खोब्रागडे यांच्या उपस्थितीत शेकडो शेतकरी बांधव सहभागी झाले होते.