केंद्रीय मंत्रालयाकडून आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आशा रुखसार शेख यांचा गौरव

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.13डिसेंबर):-जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव आरोग्यवर्धिनी केंद्रातून उत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख या आशा स्वयंसेविकेला राज्यातून सातव्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी ही यादी जाहीर केलेली आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाची मान उंचावली आहे. तसेच आशा स्वयंसेविकामध्ये उत्साहाने काम करण्याची जिज्ञासा उत्पन्न झालेली आहे.

श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख यांनी आपल्या कार्यक्षेत्रात आशा योजनेच्या कामासोबतच कोरोना सारख्या साथीच्या रोगामध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेमध्ये देखील ठरवून दिलेले उद्दिष्टे वेळेवर पूर्ण केले आहे.

श्रीमती. रुखसार मुस्तफा शेख आशा स्वयंसेविका यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुमार आशीर्वाद तसेच आरोग्य विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बनसोडे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री, जिल्हा समूह संघटक श्री. धिरज सेलोटे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.