मूकबधिर मुलीवर बलात्कार व हत्याप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी

26

🔹लहुजी शक्ती सेना च्या वतीने श्रीरामपूर तालुका तहसीलदारांना निवेदन

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

श्रीरामपूर(दि.17डिसेंबर):-बिलोली जिल्हा नांदेड मधील मातंग समाजातील मूकबधिर मुलीवर बलात्कार करून अमानवीय निघ्रूपणे हत्या केल्याप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करून दोघांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासाठी लहुजी शक्ती सेना श्रीरामपुर तालुका यांच्या वतीने तहसील कार्यालयात अर्ज देण्यात आला आहे.

9 डिसेंबर 2020 नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात झोपडपट्टी बिलोली येथील सुनिता कुकडे वय वर्षे 27 अनाथ आणि मूक बधिर मुलीवर उषा असहाय्यतेचा फायदा घेत केलेला बलात्कार, अत्याचार, आणि तिचा खून. प्रकरणी लहुजी शक्ती सेना श्रीरामपुर तालुका जिल्हाध्यक्ष यांच्यावतीने जाहीर शब्दात निषेध नोंदवण्यात येत आहे. त्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे असं कृत्य करणारे त्या नराधमास त्या घटनेस आणखीन सोबती आहेत का ? असा प्रश्न लहुजी शक्ती सेना यांनी केला आहे. याबाबत सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

आरोपीला महाराष्ट्र शासनाच्या असलेल्या महिला अन्याय अत्याचार विरोधी कायदा म्हणजेच दिशा किंवा शक्ती कायद्यांतर्गत वीस दिवसांच्या आत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालून लवकरात लवकर दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
महिलांवरील अत्याचाराची घटना दिवसेंदिवस वाढत चालले आहेत, त्यामध्ये कुठलाही स्तरावरील. कुठल्याही समाजातील, कुठल्याही जाती, धर्मातील मुली महिला सुटलेले नाहीत. त्या अशा संबंध घटना बद्दल लहुजी शक्ती सेना तीव्र आणि जाहीर निषेध करत आहे.

श्रीरामपूर तालुका तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी लहुजी शक्ती सेना चे जिल्हा अध्यक्ष श्री गणेश सोपानराव हे उपस्थित होते, त्यांच्याबरोबर लहुजी शक्ती सेनाचे संजय राजू नन्नवरे,समाज सेवक सुरेश विष्णू दोडके समाज सेवक,भागचंद भानवगिरे पत्रकार,सतीश माणिक सरोदे पत्रकार,संजय जाधव
पत्रकार उपस्थित होते