डॉक्टर शेळके मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी बीड मुडझा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचगाव येथे दिली भेट

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.25डिसेंबर):- आज दिनांक 24 डिसेंबर 2020 ला शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी,(वर्ग पाचवी व आठवी) ला माननीय डॉक्टर शेळके मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी बीड मुडझा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचगाव येथे भेट दिली.

1)विद्यार्थी बैठक व्यवस्था.

2)सर्व विद्यार्थ्यांना मोबाईलची व्यवस्था करून देणे या संबंधाने सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

3)काही विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करून त्यांच्या स्वाध्याय वह्यांची पाहणी केली.

4)अभ्यास कसा करावा व स्वाध्याय कसा सोडवावा या संबंधात मार्गदर्शन केले.

5) विद्यार्थ्यांच्या इंग्रजी हस्ताक्षराची प्रशंसा केली.

6) परिसर स्वच्छता व शैक्षणिक व्यवस्थापनाबाबत समाधान व्यक्त केले. समग्र शिक्षा अंतर्गत विशेष शिक्षक श्री. नोगेंद्र मोरघडे सर उपस्थित होते,त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.