शेतकऱ्यांसाठी शेकडो ट्रॅक्टर ची तहसील कार्यालयावर धडक

29

🔹काळे कायदे रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार

✒️मोताळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मोताळा(दि.25डिसेंबर):- केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्याचा मागणीसाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या वतीने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली मोताळा तहसिल कार्यालयावर भव्य किसान बचाओ चा नारा बुलंद करणारी ट्रॅक्टर रॅली आयोजित करण्यात आली होती.

शहरातील प्रमुख मार्गावरून फिरत निघालेला शेकडो ट्रॅक्टरचा ताफा, त्यावर फडकणारे काँग्रेसचे झेंडे, त्यामागे धावणार्‍या सुसाट दुचाकी, आघाडीवरील वाहनाचे सारथ्य करणारे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, त्यात स्वार जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जेष्ठ नेते मुखत्यारसिंग भाऊ राजपूत व अन्य नेते, पोलिसांचा तगडा बंदोबस्त अशा थाटात व जोशात आज, २४ डिसेंबरला काँग्रेसतर्फे तहसील वर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा सर्वार्थाने हटके, पक्षाचे मिनी शक्ती प्रदर्शन व हजारो मोताळेकरांचे लक्ष वेधणारा ठरला!

मोताळा बाजार समिती येथून प्रारंभ झालेला हा मोर्चा बाजारपेठ, मार्गे तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी काँग्रेसमधील सचिन व सेहवागची जोडी समजल्या जाणार्‍या राहुल बोंद्रे व बंटी दादा ही गोड जोडी आघाडीवर राहून सहभागी झाल्याने व त्यांच्या धुव्वाधार भाषणाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावल्याचे दिसून आले.

केंद्र सरकार नवे शेतकरी विधेयक रद्द करणार नाही तोपर्यंत काँग्रेस मागे हटणार नाही, असा खणखणीत इशारा या नेत्यांनी दिला. यावेळी देण्यात आलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमला होता. या वेळी मोताळा तालुकाध्यक्ष, मोताळा शहराध्यक्ष पदाधिकारी, इतर संलग्न फ्रंटल चे कार्यकर्ते व शेतकरी या रॅलीत सहभागी झाले होते.