तहसील कार्यालयात गाव पुढाऱ्यांची गर्दी

30

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.25डिसेंबर):-राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावपुढार्यांनी उमेदवारांना लागणार्या कागदपत्रांची जुळवाजुळव करायला सुरुवात केली आहे. आपपल्या उमेदवारांची कमी असलेली कागदपत्रे काढण्यासाठी गावपुढारी तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत.

यामुळे तहसील यंत्रणेवर ताण येत आहे. अगोदरच अपुरा कर्मचारी वर्ग त्यात ही गर्दी. उत्पन्नाचे दाखले, जात प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, ही सर्व कागदपत्रे तहसील कार्यालयातच मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात तौबा गर्दी पहायला मिळत आहे. एक मात्र नक्की की निवडणूकीत काहीही झाले तरी शासनाला भरपूर कर गोळा होताना दिसत आहे.