हिंगणघाट एस.टी.आगारात बसेसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा

30

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.25डिसेंबर):-स्थानिक आगारात बसेसचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्याने ग्रामिण भागातील फेर्‍यांवर त्याचा मोठा परिणाम दिसुन येत आहे.ग्रामीण भागातील बससेवा अजूनही सुरळीत न झाल्याने शेकड़ो विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित झाले असून एसटी बससेवेअभवी मनस्ताप होत आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बससेवेअभावी होत असलेली हेळसांड़ पहाता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्यावतीने काल गुरुवार रोजी परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या समस्यावर तात्काळ तोड़गा न काढल्यास आन्दोलनाचाही इशारा यावेळी देण्यात आला.याप्रसंगी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हा पदाधिकारी अक्षय इंगोले,धनंजय जाधव,तालुका अध्यक्ष दिनेश काटकर,शुभम घोडे,पवन झोटिंग इत्यादि उपस्थित होते.चर्चेदरम्यान तोड़गा न निघाल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना पोलिस कारवाई करण्याची धमकीसुद्धा एसटी अधिकाऱ्यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती घेतली असता परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगाराअंतर्गत नागपूर,वर्धा,अमरावती इत्यादीसह राज्यातील मोठ्या शहरासोबतच हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील ग्रामिण भागातील प्रवासी वाहतुक संचालित केल्या जाते.कोरोनामुळे संचारबंदी लागल्याने मागील नऊ महिन्यापर्यंत परिवहन मंडळाची प्रवासी वाहतुक बर्‍याच कालावधीपर्यंत बंद होती.आता बऱ्याचअंशी जनजीवन सुरळीत झाले असुन शाळासुद्धा सुरु झाल्याने प्रवाशांसोबत विद्यार्थ्यांनाही शहराकडे धाव घ्यावी लागत आहे.

परंतु परिवहन मंडळाच्या हिंगणघाट आगारात बसेसची मोठ्या प्रमाणावर कमतरता असल्याने ग्रामिण भागात बससेवा अद्यापपर्यंत सुरळीत झाली नाही,प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शालेय वेळेनुसार बससेवा उपलब्ध नाही.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.ग्रामीण भागातील नागरीक शहरात ये-जा करण्यासाठी प्रवासी वाहनांचा आधार घेतांना दिसतात. परंतु प्रवासी वाहनाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजणे पासधारक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य होऊ शकत नाही.

आनलाईन शिक्षणप्रणालीत मोबाईल व नेटवर्क अभावी शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असतांनाच आता प्रवासाच्या सोई अभावी शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे. अशातच अद्यापर्यंत हिंगणघाट पासुन चिकमोह,वणी,जांगोना,परडा,डोंगरगाव,करुळ पवनगाव ईत्यादी अनेक गावांपर्यंत बससेवा पोहचु शकलेली नसल्याने ग्रामीण भागातुन येणाऱ्या विद्यार्थ्यां संतप्त झाले आहे.हिंगणघाट आगाराचे व्यवस्थापक नेवारे यांचेशी संपर्क साधला-असता हिंगणघाट आगारात सध्या जवळपास बारा बसेसची कमतरता असल्याने आम्ही पुर्ण फेर्‍या चालवु शकत नसल्याचे त्यांनी प्रतिनिधीस सांगीतले.