सत्यवानाची सावित्री ऐकण्याऐवजी ज्योतीबाची सावित्री ऐका – प्रविण महाजन

36

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.3जानेवारी):-दोंडाईचा शहर भारतीय जनता पक्षातर्फे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर चौकात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी प्रविण महाजन यांनी बोलताना सांगितले की आजही समाजातील स्रीयांना दुय्यम स्थान दिले जाते कारण आपण आजही सत्यवानाच्या सावित्रीचे पारायण जाणीवपूर्वक ऐकले जाते , त्याऐवजी ज्योतिबाच्या सावित्रीचे पारायण केले तर समाजात कोणतीही स्री अबला , परावलंबी राहुच शकणार नाही.

तसेच संपूर्ण जिवन दिनदलीत समाजाच्या उत्थानासाठी झोकुन दिले यावर्षी कोरोनाकाळात जसे व्यक्ती दगावले तरी परिवारातील व्यक्तींऐवजी आरोग्य विभाग अत्यंविधी करीत होता अशीच परिस्थिती १८९० साली प्लेगच्या साथीने पुण्यात होती कुटुंबांतील सदस्यला प्लेग झाला तर वेशीबाहेर टाकुन देत होते.

परंतु सावित्रीबाईंनी अशा रुग्णांना ससाणेनगर येथील डॉ यशवंतच्या दवाखान्यात मगरपट्यातुन आपल्या पाठीवर आणण्याचे महान कार्य करुन अशाच साथीच्या आजार होऊन आपला प्राण दिला.कृष्णा नगराळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की आपल्या स्वांतत्रपुर्व काळात दिनदलीत ,बहिष्कृत समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणुन समाजाला साक्षर करण्यासाठी पहिली मुलींची शाळा काढली .माजी विरोधी पक्षनेते विजय मराठे ,भाजपा सरचिटणीस भरतरी ठाकुर ,कामगार संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ बैसाने इ मान्यवरांनी आपल्या शब्दांनी सावित्रीमाईंच्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाला उपस्थित भाजपा शहराध्यक्ष प्रवीण महाजन, प्रभागातील नगरसेवक भाजपा सरचिटणीस कृष्णा नगराळे, नगरसेवक हितेंद्र महाले, भरतरी ठाकुर, माजी विरोधीपक्ष नेते विजय मराठे, ईश्वर धनगर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राजेंद्र धनगर, रघुनाथ बैसाणे,मुरलीधर वंजारी , कांतीलाल मोहिते, दीपक बाविस्कर, संजय चंदाणे, रवींद्र महाले, सचिन नगराळे, रवींद्र अहिरे, राजेंद्र आगळे, गोविंदा नगराळे, राजेन्द्र नगराळे, धनराज करणकाळ, कैलास पवार, अजय बिऱ्हाडे, मुकेश नगराळे, विजय बेडसे, मिलिंद नगराळे, भुपेंद्र मोहिते, फ्रफुल नगराळे, भैय्या नगराळे, रवींद्र नगराळे, दीपक रामराजे, आण्णा सुतारे, योगेश नगराळे, युवराज काकडे, दगडू वानखेडे,जुगणु चव्हाण, संतोष मोहिते, गोपाल देवरे इ मान्यवर उपस्थित होते