गौतम नगर गंगाखेड नियमांकुल करण्याची प्रतीक्षा संपणार

38

🔹आगामी वर्षात नियमांकुल करून गत 25 वर्षा पासून चा प्रश्न निकाली काढणार –अविनाश जगतकर

✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.7जानेवारी):-गंगाखेड शहरातील गत 25 वर्षा पासून निवासी प्रयोजनासाठी रहात असलेल्या गौतम नगरतील सरव्हे न. 254 मधील गायरान जमिनीवर रहात असलेल्या मगासवर्गय व भूमिहिन बहुजण समाजातील गोरगरीब व कस्टकरी समाजा चे 200 ते 300 कुटूंबातील घरे अतिक्रमण करून रहात जागेवर च्या लोकांना आगामी वर्ष 2021मध्य रहिवासी यांना कायमस्वरूपी नियमाकुल करून देनार असे लढा गायराना जमीनीचा प्रनेते अविनाश जगतकर यांनी मनोदय वेक्त केला आहे.

काही विवेकीं माणसं येथील रहीवाशां ची दिशाभूल करून अतिक्रमित जागा नियमांकुल करण्याचे गत 5 वर्षा पासून केवळ वलग्ना करत आहेत, परंतु त्याना या कामास अध्याप पर्यंत यश आलेले नाही. आमच्या प्रतिनिधीसी बोलताना अविनाश जगतकर म्हणाले कीं मी कोणतंही आंदोलन न करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक मार्गा चा वापर करून या नगरातील गोरगरीब लोकांच्या जागेला नियमाकुल करणार व त्याना रमाई घरकुल व प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ देऊन त्याना विविध विकास योजनेशी जोडणार असे ते म्हणाले.