जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त करमाळा तालुका मराठा सेवा संघाचे आरोग्य शिबीरात 50 महिलांची मोफत आरोग्य तपासणी

35

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.13जानेवारी):- राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे मातृत्वाचा अत्युच्च मानबिंदू असून संस्कारक्षम समाजाच्या उभारणीसाठी जिजाऊंचे विचार आचरणात आणणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी केले. मराठा सेवा संघ करमाळा तालुका आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील ,माजी तालुकाध्यक्ष प्रा नागेश माने ,डॉ बिभीशण सारंगकर, तालुका कृषी अधिकारी देविदास सारंगकर ,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,सहा.पो.निरीक्षक रोहित चौधरी,प्रसिद्ध वक्त्या रोहिणी वीर ,डॉ विनया सारंगकर,संभाजी ब्रिगेड माजी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुर्वे, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद जिल्हा कार्याध्यक्ष सतीश वीर ,तालुकाध्यक्ष अजित कणसे , सचिव संतोष शितोळे मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, तालुका सचिव सचिन शिंदे, उपाध्यक्ष अजिनाथ घाडगे , संघटक सागर वारे,विनोद शितोळे,संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अमित घोगरे, सचिव गणेश डोके,परितेवाडी शाखाप्रमुख शिवश्री शंकर नागणे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, नेते दीपक शिंदे,युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे,भैय्यासाहेब पाटील, पत्रकार नानासाहेब घोलप, उत्तमराव वीर, पोपट पाटील, अंकुश सुरवसे, जिजाऊ इंग्लिश स्कूल च्या संचालिका सौ ज्योती वारे पाटील, सौ तृप्ती शिंदे,सौ रुपाली शितोळे, सौ सुनीता वीर,सौ राणी घोलप,सौ तेजस्विनी सुरवसे, आदी उपस्थित होते 

मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने 50 महिलांची हिमोग्लोबिन व शुगर तपासणी करण्यात आली. करमाळा येथील कमलाई लॅबचे महेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर संपन्न झाले.कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील यांनी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय स्वरूपात गेल्या 30 वर्षांपासून साजरा होत असून मराठा सेवा संघाने महापुरुषांच्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे काम केल्याचे प्रतिपादन यावेळी बोलताना केले.

यावेळी सई अंकुश सुरवसे या बालिकेने जिजाऊ माँसाहेबांवर सादर केलेल्या छोट्या भाषणाने उपस्थितांची वाहवा मिळवली.यावेळी मराठा सेवा संघ तालुका संघटकपदी निवड झाल्याबद्दल प्रदीप सरडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शितोळे यांनी केले तर अजित कणसे यांनी आभार मानले.