परिते ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व

31

✒️नागेश खूपसे(सोलापूर प्रतिनिधी) मो:-7775096293

सोलापूर(दि.21जानेवारी):-माढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या परिते ग्रामपंचायतीवर नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व लोकप्रिय आमदार मा.बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे शिंदे पुरस्कृत ज्योतिर्लिंग ग्रामविकास आघाडीने ११/० ने निर्विवाद विजय संपादन करत एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे.विरोधकांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वार्ड क्रमांक एकमधून सौ.मनिषा नवनाथ लामकाने यांनी समोरच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत तब्बल १५ वर्षांचा अबाधित असलेला विरोधकांचा बालेकिल्ला लिलया भेदून विरोधकांना चारीमुंड्या चीत करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
सौ.मनिषा लामकाने यांचेबरोबरच सौ.अर्चना मुसळे व श्री.हनुमंत भोसले यांनीही विजय संपादन केला आहे.

वार्ड क्रमांक दोनमधून श्री.लक्ष्मण तात्या लांडे.श्री.कलावती झांबरे व श्री.भारत माळी यांनीही आपल्या विरोधी उमेदवारांचा दारुण पराभव करत विजय संपादन केला.
वार्ड क्रमांक तीनमधून श्री.ज्ञानदेव जगताप व सौ.रुपाली धुमाळ यांनीही आपल्या विरोधी उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करून विजय संपादन केला आहे.

सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या वार्ड क्रमांक चारमधून श्री.धिरजकूमार ब्रम्हदेव लामकाने यांनी समोरच्या उमेदवाराचा दारुण पराभव करत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे त्याचबरोबर याच वार्डातून सौ.कांचन शेळके व कलावती कुंभार यांनीही आपल्या विरोधी उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे.
परिते ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे व पार्टी प्रमुख श्री.दादासाहेब देशमुख व श्री.महादेव लांडे (चेअरमन) यांचे आ.बबनदादा शिंदे.आ.संजयमामा शिंदे .मा.रणजित शिंदे मा.विक्रमसिंह शिंदे.मा.धनराज शिंदे यांनी अभिनंदन केले.

या ऐतिहासिक विजयासाठी मा.महादेव मोरे,मा.अभिमान जाधव मा.बाळकृष्ण जगताप,मा.पांडूरंग येवले.मा.लक्ष्मण लामकाने.मा.गणेश लामकाने मा.दत्ता लामकाने.मा.सुभाष उंबरकर मा.दगडू उंबरकर,मा.मधूकर लांडे,मा.भारत वजाळे मा.दशरथ येवले,मा.पोपट लांडे.मा.सतिष मुसळे मा.कुबेर भोसले, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा.गणेश पावसे,ज्ञानेश्वर लामकाने,सत्यवान धुमाळ,बालाजी धुमाळ.पै.अक्षय लांडे, महेश लांडे, दिनेश मुसळे,धिरज मुसळे,पवन मुसळे इत्यादी लोकांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी पदवीधर संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मा.गणेश पावसे म्हणाले की जनतेने जो मोठ्या विश्वासाने आम्हाला कौल दिला आहे त्याला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही.

जनतेच्या कोणत्याही कामांसाठी आ.बबनदादा शिंदे, आ.संजयमामा शिंदे व पालकमंत्री मा.दत्तामामा भरणे यांचे मार्गदर्शनाखाली देशाचे नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब व उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांचेपर्यंत कामांचा पाठपुरावा करून गावातील शेवटच्या लोकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न करणार असल्याचे श्री.गणेश पावसे यांनी सांगितले आहे.