26 जानेवारीला होणारी ग्रामसभा रद्द

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.21जानेवारी):-काेरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासन आदेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार गत मे महिन्यापासून ग्रामपंचायतींच्या ग्रामसभाही स्थगित करण्यात आल्या होत्या. अशातच आता १५ जानेवारी रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामसभावरील स्थगिती उठविली होती त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये येत्या २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होणार होती. मात्र पुन्हा नविन सरपंचाची निवड व कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा ३१ मार्च २०२१ पर्यत ग्रामसभेला स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३)च्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. अशातच कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी शासनादेश, अधिसूचना निर्गमित केल्या आहेत. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय सभांवर बंदी घालण्यात आली होती. सदर आदेश व कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेत असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुर्भावाच्या दृष्ट्रीने योग्य नाही नसल्याची बाब विचारात घेऊन शासनाने ग्रामसभा घेण्यास तात्पुर्ती स्थगिती दिली होती.

सध्याच्या स्थितीत कोविडच्या अनुषंगाने लॉकडाऊन काळातील निर्बंधांत शिथिलता येत असून बहूतांश जनजीवन पूर्ववत होत असल्याने ग्रामसभांच्या आयोजनास दिलेली स्थगिती उठविण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती. त्यानुसार आता कोविडच्या लॉकडाऊनमधील स्थिती पूर्वपदावर येत असल्याने ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या ग्रामसभा घेताना फिजिकल डिस्टन्स, तसेच कोविड १९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक तत्त्वांचे कोटकोर पालन करून ग्रामसभांना परवानगी देण्यात आल्याने आता पूर्वीप्रमाणेच ग्रामसभा पार पडणार होत्या आता अजुन पुन्हा नविन सरपंचाची निवड व कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव हे कारण पुढे करित पुन्हा ३१ मार्च २०२१ पर्यत ग्रामसभेला स्थगिती दिली आहे.

महाराष्ट्र, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED