महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीच्या सदस्यपदी ग्रंथमित्र भाऊ पत्रे यांची निवड

25

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.22जानेवारी):- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ निवड समितीच्या सदस्यपदी कोंढाळा निवासी ग्रंथमित्र भाऊ पत्रे यांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यात प्रकाशित झालेल्या उपयुक्त अश्या ग्रंथ निवडीचे कार्य ही समिती करीत असते. सदर नेमणूक पुढील तीन वर्षासाठी असणार आहे.
ग्रंथमित्र भाऊ पत्रे यांचे सामाजिक , शैक्षणिक तसेच ग्रंथालयाच्या कार्यात मोठे योगदान असून ते सध्या नागपूर विभागीय ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह म्हणूनही त्यांची अविरोध निवड झालेली आहे. ते अरूणनगर जि. गोंदिया येथील बंगाली भाषिक विद्यार्थ्यांच्या नुतन हिंदी हायस्कुलचे मुख्याद्यापक म्हणून कार्यरत आहे.

चप्राड (सोनी ) जि. भंडारा येथे २००४ साली संपन्न झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. शिक्षक भारती ह्या राज्यव्यापी शिक्षक संघटनेचे ते नागपूर विभागीय अध्यक्ष असून आ.कपील पाटील यांचे विश्वासू समजले जाते. ते श्रीगुरूदेव सेवा मंडळ तसेच झाडीबोली साहित्य मंडळाशी जुळलेले असून एक तळमळीचे ग्रंथसेवक म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे.कोंढाळा येथे त्यांनी स्वखर्चातून आपल्या घरापेक्षा मोठी वाचनालयाची इमारत उभी केलेली आहे . त्यांच्या निवडीबद्दल राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद व झाडीबोली साहित्य मंडळातर्फे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी त्यांचा सत्कार करून शुभकामना दिल्यात. ग्रंथमित्र पत्रे यांचे दुरध्वनीद्वारे आ.कपील पाटील, डाॕ. हरिश्चंद्र बोरकर , अशोक बेलसरे , सुभाष मोरे , प्रा. राजेंद्र झाडे , डाॕ. गजानन कोठेवार , संजय खेडीकर , किशोर वर्भे , सुरेश डांगे , उमेश सिंगनजुडे आदींनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.