ऊस गाळपात माजलगाव तालुक्यातील जय महेश कारखाना मराठवाड्यात अव्वल

31

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.29जानेवारी):- तीन महिन्यांपासून मराठवाड्यातील 14 साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. आतापर्यंत पाच लाख मे. टन उसाचे गाळप करत माजलगाव तालुक्यातील जयमहेश शुगर अव्वल स्थानी राहिला. कळंब तालुक्यातील रांजणी येथील नॅचरल शुगर कारखान्याने साडेचार लाख मे. टन उसाचे गाळप करत दुसरे स्थान पटकावले. साखर उताऱ्यात मात्र वसमत येथील पूर्णा कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे.

दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. माजलगाव तालुक्यातील एक खासगी व दोन सहकारी साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यांपासून जोरदार गाळप सुरू केले.पवारवाडी येथील जयमहेश शुगर या खासगी कारखान्यात रोज चार हजार 500 मे.टन एवढे गाळप होत आहे. 22 जानेवारीपर्यंत चार लाख 68 हजार 530 मे. टन गाळप करत मराठवाड्यातील 14 कारखान्यांत सर्वांत जास्त उसाचे गाळप करणारा हा कारखाना ठरला.