अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डने पुण्याचे प्रसन्न मोरे सन्मानित

24

✒️सुनिल भोसले(पुणे प्रतिनिधी)मो:-9146241956

पुणे(दि.३०जानेवारी):- अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीच्या वतीने पुण्यातील प्रसन्न दीपक मोरे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते डॉक्टरेट उपाधी देण्यात आली असून त्यांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड ही देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
2020 मध्ये भारतासह जगभरात कोरोनाचे मोठे संकट निर्माण झाले असताना अशा कोरोना महामारीच्या संकट काळात संपुर्ण भारतात सामान्य जनतेच्या मदतीला विशेष सामाजिक कार्यकर्ते धावून गेले या काळात अनेकांनी उल्लेखनीय कार्य केले, अशांची दखल घेत अमेरिकन युनिव्हर्सिटी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीच्या वतीने देशभरातील सुमारे 53 जणांना नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच 32 लोकांना डॉक्टरेट उपाधी देण्यात आली. यामध्ये पुण्याचे वायर्डअसेट्स मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ. प्रसन्न दीपक मोरे यांचाही समावेश होता. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते प्रसन्न मोरे यांना डॉक्टरेट उपाधी आणि नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम नेल्सन मंडेला ग्लोबल पीस अवॉर्ड अकॅडमीचे संस्थापक राजकुमार टाक यांच्या वतीने मुंबई येथील सहारा स्टार हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसन्न मोरे यांच्या सेाबत अजित विठ्ठल भोसले उपस्थित होते.
अशा संकट काळात सामोरे गेलेल्या लोकांकडून प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार भारतातील सर्व राज्यांतील लोकांना देण्यात आला.