धक्कादायक…पोलिओ लस देण्याऐवजी 12 मुलांना पाजले सॅनिटायझर

32

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

यवतमाळ(दि.2फेब्रुवारी):- मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे 12 बालकांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिओ लसीकरणादरम्यान घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी इथे हा धक्कादायक प्रकार घडला.

1 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओची लस देण्यात आली होती. पण अचानक मुलांना उलट्याचा त्रास सुरू झाला. मुलांना उलट्या होण्याचे कारण तपासले असता पोलिओ लसीकरणादरम्यान सॅनिटायझर पाजण्यात आले होते, हे उघड झाले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. मुलांच्या पालकांनी घडलेल्या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.