राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराईत

31

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.2फेब्रुवारी):-मराठा आरक्षण प्रश्नी जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे दि.२० जानेवारी रोजी सुरू असलेल्या राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाचे लोण आता गेवराई तालुक्यात पोहचले.या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेवराई तालुक्यातील मालेगाव खुर्द येथे आजपासून ठिय्या आंदोलन सुरू झाले आहे.

या आंदोलनाला मराठा समाज बांधवांसह इतर समाजाचाही भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.दरम्यान पहिल्याच दिवशी या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व ग्रामस्थ यांच्यासह परिसरातील मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.