जिवती शहरात अवैध दारूचा महापूर- दारु माफिया जोमात, स्थानिक पोलीस प्रशासन मात्र कोमात!

38

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.6फेब्रुवारी):- जिवती हा अतिदुर्गम आदिवासी व शैक्षणिक रित्या मागासलेला विकासापासून काही प्रमाणात वंचित असलेला तालुका आहे, इथे अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. त्याचपैकी एक समस्या म्हणजे जिवती शहरात होणारी अवैध दारू विक्री ही आहे, या अवैध दारू विक्रीचा सध्या जिवती तालुक्यात वाजागाजा पाहायला मिळत आहे. हा गोरखधंदा खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन मात्र याकडे फक्त बघ्याची भूमिका का घेत आहेत, हे येथील स्थानिक नागरिकांना कळत आहे. ही अवैध दारू विक्री स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने मोठया प्रमाणात सुरू आहे अशी खमंग चर्चा सध्या शहरात जागोजागी ऐकायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1 एप्रिल 2015 पासून दारू बंदी झाली पण त्याची अंमलबजावणी जिवती शहरात होताना दिसत नाही, दारूबंदी निर्णयाला शहरात केराची टोपली दाखवली जात आहे.

या दारू माफिया कडून पोलिसांना हप्ता पोहोचविले जात असल्याची कबुली खुद्द दारू विक्रेत्यांन कडून केली जात आहे हा अवैध दारू विक्री राजरोसपणे दिवसाढवळ्या सुरू आहे, स्थानिक जनतेला असे वाटले होते की संतोष अंबिके हे नविन ठाणेदार आले आहे आता खैर नाही अवैध दारू विक्रेत्याची, स्थानिक जनतेला निराशा झाली हा अवैध धंदा रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाची कसल्याच प्रकारची मानसिकता दिसून येत नाही आहे, दारू विक्री खुलेआम सुरू असल्याने तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी व गुन्हेगारांची संख्या देखील वाढताना दिसत आहे, आता सध्या जिवती शहरात नगरपंचयात निवडणुकांची रेलचेल सुरू आहे, याचाच फायदा घेत शहरातील काही महाभागांनी दारूची विक्री करणे, व मजुरदार, शेतकरी, व युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे वळविण्याचे काम हे दारूवाले करत आहेत.

निवडणूका येत असल्याने जिकडे – तिकडे दारू व मटण्याच्या मेजवान्या जोमात सुरू आहेत, गरजू उमेदवार आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी अवैध दारूची जमवाजमव करत आहेत,त्यामुळे अवैध दारू विक्रीला व साठेबाजी करण्याला उत आल्याची चर्चा आहे. येणाऱ्या नगरपंचयात निवडणुकीत दारूचा महापूर वाहणार असल्याचे सुजाण नागरिक सांगत आहेत, याच प्रमाणे जिवती शहरासह ग्रामीण भागात देखील सुरू असलेली अवैध देशी – विदेशी दारू विक्रीकडे पोलिसांनी लक्ष देऊन येणाऱ्या निवडणूक काळात वाईट प्रकार घडणार नाहीत याकडे प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी व्यसनाधीनतेचा विरोध करणाऱ्या महिला – पुरुष नागरिकांतून केला जात आहे.