कुंडलवाडी च्या नपाच्या उपाध्यक्षपदी महाविकास आघाडीचे शैलेश -याकावार यांची बिनविरोध निवड

21

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

बिलोली(दि.15फेब्रुवारी):-तालुक्यातील कुंडलवाडी येथील नगर परिषदेचे उपाध्यक्ष पदाची निवड आज नगरपालिकेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार कैलाशचन्‍द्र वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली झाली असून उपाध्यक्ष निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे हे उपस्थित होते.
महाविकास आघाडीकडून एकमेव नामनिर्देशन पत्र शैलेश -याकावार यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने सदरील निवडणूक बिनविरोध झाली आहे. नगराध्यक्षपद बरोबरच उपाध्यक्ष पदही महाविकास आघाडी ला मिळाल्याने हा महाविकास आघाडी चा मोठा विजय मानला जात आहे.

नगरपालिकेतील १७ नगरसेवकापैकी ५ नगरसेवक अनुपस्थित होते. विठ्ठल कुडमुलवार, विना कोटलावर, शकुंतलाबाई खेळगे, सुरेश कोंडावार, रिहाना पाशामिया हे ५ नगरसेवक अनुपस्थित होते तर उपस्थित नगरसेवक नगराध्यक्षा सुरेखा जिठावार, नंदाबाई कांबळे, गंगोणे गंगा प्रसाद, अशोक वानोळे, भास्कर गंगाबाई, अनिता पुपलवार, शंकर गोनेलवार, सावित्राबाई पडकुटलावार, सचिन कोटलावार,मुखतार खाजामियॉ शेख,प्रयागबाई श्रीरामे, यांच्यासह महा विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. हा कार्यक्रमाचा जल्लोष फटाके फोडून करण्यात आला आहे.यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाल सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता.