छत्रपती शिवरायाच्या विचारांचा व आचारांचा वारसा युवकांनी पुढे न्यावा -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे

39

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.22फेब्रुवारी):-नीतिमान, बुद्धिमान, विचारवंत, आचारवंत, आणि चारित्र्यवान रयतेच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारे रायतेविषयी मनात प्रेम, सर्वसामान्य माणसाची ओळख ठेवणारे ,स्त्रीयांचा सन्मान करणारे थोर रणनीतीतज्ञ स्वराज्य संस्थापक असे जगातील महान छत्रपती शिवराय त्यांच्या राज्यात सर्व जाती धर्माच्या मावळ्यांना संधी देऊन उपेक्षित व वंचित असणाऱ्या लोकांचे शिवरायांनी नेतृत्व विकशीत केले व स्वराज्य स्थापन केले.

यासाठी निष्ठावंत लोकशक्ती निर्माण केली माणसे ओळखले जातीभेद,अंधश्रद्धा यावर प्रहार केले त्यांच्या काळात त्यांची प्रजा ही सुखी होती प्रजेचा विकास करायचा असेल तर शिवरायां प्रमाणे मनाचा थोरपणा हवा म्हणून आजच्या युवकांनी शिवरायांच्या विचारांचा व आचारांचा वारशा चालवण्यासाठी पुढे या अश्या ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी तिरखुरा येथील स्व. विजयराव दळवी स्मूर्ती शिवशाही युवा प्रतिष्ठान तिरखुरा येथील शिवजयंती कार्यक्रमात शिवव्याख्यान देत असताना आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की युवकांनी युवतींने कुशल नेतृत्व तयार करा व पुढे या व लोकशाही सदृढ करा आणि संविधान चे रक्षक व्हा राजकीय सामाजिक दृष्टी विकसित करा एका मताची किंमत समजून घ्या सर्व जाती धर्मातील समाजातील सामाजिक प्रश्न युवकांनी व युवतींना सोडवता आले पाहिजे त्यावेळी मोबाईल नव्हते टीव्ही नव्हती तरी शिवरायांनि मावळे तयार केले व स्वराज्य काय असते सर्व जगाला दाखवून दिले व प्रजेला सुखी ठेवले म्हणून प्रत्येकाच्या विचारांचा सन्मान आदर युवकांनी केला.

तरच आपला महाराष्ट्र हा शिवरायांच्या काळातील दिसेल ही खूप मोठी जबाबदारी आपणावर आहे आदर्श समाजाची निर्मिती च स्त्री व पुरुष मिळून च करयेचे आहेअशे ही त्या यावेळी म्हणाल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अद्यक्ष विलास घारगे हे होते तर प्रमुख पाहुणे ,दिलीपराव नलोडे अनिल जाधव, माधवराव नलोडे माधुरी वीर ह्या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश मगर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन सचिन घारगे यांनी केले कार्यक्रमाचे आभार अनिकेत जाधव यांनी केले व कार्यक्रमा च्या यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रोशन नलोडे ,पवन मगर, शुभम मगर पंकज घारगे या सर्व स्व. विजयराव दळवी स्मृती शिवशाही युवा प्रतिष्ठान तिरखुरा युवा मंडळी नि शासनाचे सर्व नियम पाळत शिवजयंती साजरी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले